Social Media Precaution Scam eSakal
महाराष्ट्र बातम्या

हातात शस्त्र घेऊन स्टेट्स ठेवू नका, अन्यथा..! सोलापूर शहर पोलिसांनी २० दिवसांत डिलिट केल्या सोशल मिडियावरील २६ पोस्ट; ३६ प्रकरणात १७ जणांवर कारवाई

सोशल मीडियावर सामाजिक, राजकीय, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या २६ आक्षेपार्ह पोस्ट शहर पोलिसांनी हटविले आहेत. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ११ ते ३१ मार्च या काळात शहर पोलिसांनी ३६ प्रकरणांमध्ये १७ जणांवर कारवाई केली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोशल मीडियावर सामाजिक, राजकीय, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या एकूण २६ आक्षेपार्ह पोस्ट व व्हिडिओ शहर पोलिसांनी हटविले आहेत. पोलिसांकडून सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ११ ते ३१ मार्च या काळात शहर पोलिसांनी ३६ प्रकरणांमध्ये १७ जणांविरुद्ध कारवाई केली आहे.

दोन धर्मात, जातीत किंवा गटात तेढ निर्माण होईल, अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल करणे गुन्हा आहे. एखादा धर्म किंवा जाती विषयक, महापुरुषांबद्दल बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्यास भारतीय दंड विधान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो. दुसरीकडे भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार देखील गुन्हा दाखल होतो. ११ ते ३१ मार्च या काळात फौजदार चावडी पोलिसांनी एकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर जेलरोड पोलिसांनी एकाविरुद्ध दखलपात्र तर एकावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. जोडभावी पेठ पोलिसांनी एकाविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल केला असून दहा जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दोघांविरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल केले असून सदर बझार पोलिसांनी एकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक आयुक्त प्राजंली सोनवणे, सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नागेश इंगळे, पोलिस हवालदार अविनाश पाटील, मच्छिंद्र राठोड आदींनी ही कामगिरी केली आहे.

पोलिस ठाणेनिहाय हटविलेल्या पोस्ट

  • फौजदार चावडी : ३

  • जेलरोड : २

  • जोडभावी पेठ : १२

  • एमआयडीसी : ४

  • सदर बझार : ४

  • विजापूर नाका : १

  • एकूण : २६

हातात शस्त्र घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्यांवरही होईल गुन्हा

सायबर पोलिस ठाण्यातील सोशल मीडिया मॉनिटरिंग पथकातर्फे सोशल मीडियावर लक्ष ठेवले जात आहे. शहरातील नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना जातीय तेढ निर्माण होणारे, धार्मिक भावना दुखावणारे, महापुरुषांची बदनामी करणारे आक्षेपार्ह व्हिडिओ, मेसेज, कमेंट करून कायदा व सुव्यवस्था बिघडून अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. गावठी किंवा बनावट पिस्टल, बंदूक, तलवार व इतर घातक शस्त्र हातात घेऊन सोशल मीडियावर फोटो प्रसारित करणे टाळावे. अशांबद्दल तक्रार आल्यास त्याच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल होऊन कारवाई होईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT