Amol kolhe Esakal
महाराष्ट्र बातम्या

Amol kolhe: 'शरद पवारांना सोडू नका' अमोल कोल्हेंच्या कानात चिमुकल्याची भावनिक साद, नेमकं काय घडलं?

चिमुकल्याने अमोल कोल्हेंच्या कानात येऊन मला सांगितलं की "पवार साहेबांना सोडू नका!"

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ९ नेत्यांनी शिवसेना, भाजप सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. पक्षात दोन गट निर्माण झाले. यानंतर पक्षातील काही अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून जेष्ठ मंडळींपासून अनेकांनी शरद पवारांना आम्ही तुमच्या सोबत असल्याचं सांगितलं आहे. तर काही जवळच्या नेत्यांनी देखील आधी सोबत येऊन नंतर शरद पवारांची साथ सोडली.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आणि खासदार अमोल कोल्हे यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अमोल कोल्हे यांचा साताऱ्यातील एका भाषणाचा हा व्हिडीओ आहे. साताऱ्यात एका कार्यक्रमादरम्यान एका चिमुकल्याने अमोल कोल्हेंना भावनिक साद घातली आहे. 'शरद पवार साहेबांना तेवढं सोडू नका' असं या मुलानं यावेळी म्हंटलं आहे.

साताऱ्यातील भाषणामध्ये बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, 'मला एका चिमुकल्याचं कौतूक वाटलं, एक चिमुकला पटकन म्हणाला मला बोलायचं आहे. तो आला आणि त्याने माझ्या कानात एक गोष्ट सांगितलं.'

'मला एका गोष्टीचं अप्रुप वाटलं की, माझ्या आजच्या पिढीमध्ये धिटाई आहे. ते खासदाराला सांगू शकतात, मला काहीतरी सांगायचं आहे.'

पण, त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट ही होती. त्याने जे सांगितलं, त्याच्यावरून त्याच्या घरातील राजकीय सजगता दिसून येते. त्यांनी जवळ येऊन हळूच कानात सांगितलं 'तेवढं पवार साहेबांना सोडू नका'.

पुढे कोल्हे म्हणाले, 'हा माझ्यासाठी शॉक होता. इतकं लहान पोरगं जर माझ्या कानात सांगत असेल की, मला तुमच्याशी बोलायचंय आणि त्यांनी मला सांगितलं 'तेवढं पवार साहेबांना सोडू नका', आणि त्यावेळी हा राजकीय मंच नाही पण, खात्री पटते की, समाजात जे काही होतं. ते घडत असताना त्यातून ज्या जाणिवा प्रगल्भ केल्या गेल्या. तर, ज्यांच्या खांद्यावर उद्याचं भवितव्य आहे, ज्यांच्या खांद्यावर उद्याचं राज्य आहे, ज्यांच्या खांद्यावर उद्याचा देश आहे. त्यांच्या मनातील राजकीय भावना इतक्या प्रगल्भ होऊ शकतात. याची मला पोहोचपावती मिळाली, असं कोल्हे पुढे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT