जलाशयात प्रति सेकंद 8573 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे.
पाटण (सातारा) : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगर इथं 116 मिलिमीटर, नवजाला 142 मिलिमीटर आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) 122 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय.
धरणाचा एकूण पाणीसाठा 101.57 टीएमसी झाला असून जलाशयात प्रति सेकंद 8573 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी असून पडत असलेला पाऊस आणि धरणात होणारी पाण्याची आवक याचा विचार करून धरण व्यवस्थापनानं आज दुपारी दोन वाजता दुसऱ्या वेळी धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलून पाणी नदीपात्रात सोडण्याचे जाहीर केले आहे.
दरवाजे दीड फुटाने उचलले तर सहा वक्र दरवाज्यातून 12891 क्यूसेक आणि पायथा वीज गृहातून १०५० क्यूसेक्स असा एकूण 13941 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येणार आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.