महाराष्ट्र बातम्या

Nagpur: डॉ. आंबेडकर फाउंडेशन १४ वर्षांपासून कागदावरच! विधिमंडळातील घोषणा फोल, फाईल अद्याप बंद

डॉ. आंबेडकर फाउंडेशन कागदावरच असून विधानमंडळातील ही घोषणा सध्यातरी फाईलबंद आहे.

सकाळ डिजिटल टीम

Dr Babasaheb Ambedkar Foundation: केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने डॉ. आंबेडकर फाउंडेशन तयार करण्यात येईल अशी घोषणा उपराजधानीत विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी २३ डिसेंबर २००९ रोजी घोषणा केली होती. १४ वर्ष लोटली, मात्र डॉ. आंबेडकर फाउंडेशन कागदावरच असून विधानमंडळातील ही घोषणा सध्यातरी फाईलबंद आहे.

सत्तेचाळीस वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य खंडरूपाने प्रकाशित व्हावे, यासाठी शासनाने चरित्रसाधने प्रकाशन समिती तयार केली. बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य खंडरूपाने वाचकांच्या हाती दरवर्षी येऊ लागले. मात्र बाबासाहेबांच्या साहित्य प्रकाशनात खंड पडला आणि दिल्लीच्या धर्तीवर राज्यातही ‘डॉ. आंबेडकर फाउंडेशन’ची घोषणा करण्यात आली.

विशेष असे की, नागपूर मुक्कामी डॉ. आंबेडकर फाउंडेशनचे कार्यालय ठेवण्यात येईल, असेही यात नमूद करण्यात आले होते. डॉ. आंबेडकर चरित्रसाधने प्रकाशन समितीचे पहिले सदस्य वसंत मून होते. त्यांच्या काळात बाबासाहेबांच्या साहित्य प्रकाशनाला गती होती. त्यांचे निर्वाण झाले. परंतू, निर्वाणापूर्वी त्यांनी किमान दहा ते बारा खंडांचे काम पूर्ण होईल. एवढे साहित्य संशोधित केले होते. मून यांच्या हयातीत झालेल्या खंड प्रकाशनात एन.जी.कांबळे, डॉ. एम.एल.कासारे यांचे मोलाचे योगदान होते.

मात्र २००८ पासून खंड प्रकाशन थांबले. त्यावेळी भारत सरकारच्या नियोजन आयोगाने ५ कोटींचा निधी बाबासाहेबांच्या साहित्य प्रकाशनासाठी दिला होता. मात्र निधी परत गेला. मून यांच्यानंतर तीन सदस्य सचिव बदलले, परंतू, साहित्य प्रकाशनाला गती मिळाली नाही.

नागपूरचे डॉ. कृष्णा कांबळे यांच्या परिश्रमातून २० वर्षे रखडलेला मराठी अनुवादाचा खंड ६ तयार झाला, मात्र प्रकाशनापुर्वीच डॉ. कांबळे यांचे निधन झाले. यानंतर सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांच्या प्रयत्नातून हा खंड प्रकाशित झाला. यात आढळलेल्या चुका मात्र अद्याप दुरुस्त झाल्या नाहीत, अशी माहिती प्रकाश बनसोड यांना माहिती अधिकारातून मिळाली आहे.(Latest Marathi News)

समितीच्या बैठकीत झाला होता निर्णय

२ जुलै २००३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधने प्रकाशन समितीअंतर्गत डॉ. आंबेडकर फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. ३० जून २००७ रोजी मुंबई येथे चरित्रसाधने समितीच्या बैठकीत तत्कालीन समितीचे अध्यक्ष आणि उच्च शिक्षणतंत्र मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महिनाभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन स्थापन करण्याचे आश्‍वासित केले होते.

यानंतर २२ ऑगस्ट २००८ रोजी झालेल्या बैठकीत वळसे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून दिरंगाईचे कारण विचारले होते. अधिकाऱ्यांनी महिनाभरात फाउंडेशन स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

Jowar-Beet Crackers :थंडीत चविष्ट आणि हेल्दी स्नॅक खावंसं वाटतं? घरच्याघरी बनवा ज्वारी-बिटचे क्रॅकर्स!

Vikas Thackeray : त्सुनामीच्या लाटेत पश्चिमने तारला ‘पंजा’...जनतेची मिळाली ‘विकास’ला साथ

SCROLL FOR NEXT