मुंबई : मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी नावाजलेले नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. जेजे रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील प्राध्यापक विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप करत मार्ड संघटनेने संप पुकारला आहे.
रुग्णालयाचे अधिष्ठाता प्राध्यापकांचे वेतन देत नसल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे. तसेच मार्डच्या आरोपांनी व्यथित होऊन वरिष्ठ प्राध्यापक आणि डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. यात डॉ. तात्याराव लहाने हे नाव आघाडीवर आहे. (dr Tatyarav Lahane controversy jj hospital mard strike)
डॉ. लहाने यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण लातूरमध्ये झाले. १९८१ साली त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून मेडिसीनमध्ये पदवी घेतली. १९८५ साली त्यांनी ऑप्थल्मॉलॉजीमध्ये एमबीबीएस केले.
तरूण वयात लहाने यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. त्यावेळी त्यांच्या आईने आपले मूत्रपिंड दान करून लहाने यांचा जीव वाचवला.
१९९४ साली लहाने हे जेजे रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख झाले. २००४ साली त्यांनी जेजेमध्ये रेटिना विभागाची सुरुवात केली. २००७ पर्यंत त्यांनी १ लाख मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शस्त्रक्रियांच्या संख्येचा दीड लाखांचा टप्पाही पार केला.
२००८ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१८ साली ते मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिमेचे प्रमुख होते.
२०१० ते २०१७ या कालावधीत ते ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालय आणि जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता होते. तसेच त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक म्हणूनही काम केले. २०२१ साली ते सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी जेजे रुग्णालयात सेवा देणे सुरू ठेवले होते; मात्र मार्डच्या आरोपांनंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.