driver shirur was one who took care first st bus  
महाराष्ट्र बातम्या

तुम्हाला माहिती आहे का? या व्यक्तीने चालवली होती पहिली एसटी बस...

कुणी त्यावेळच्या बसचे फोटो टाकले; तर कुणी स्वागताचे फोटो शेअर करून एसटीच्या आठवणी जागवल्या.

सकाळ ऑनलाईन टीम

राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) लालपरी प्रथम एक जून 1948 रोजी पुणे- नगर मार्गावरून धावली. शिरूरमधील चालकानेच या पहिल्या बसचे स्वारथ्य केले होते व शिरूरच्या बसस्थानकावर या बसचे धुमधडाक्‍यात स्वागत झाले होते.

या घटनेलाकाल 72 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दिवसभर त्याविषयी सोशल मिडीयावरून चर्चा चालू होती. कुणी त्यावेळच्या बसचे फोटो टाकले; तर कुणी स्वागताचे फोटो शेअर करून एसटीच्या आठवणी जागवल्या.
परिवहन महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महामंडळाची (एसटी) पहिली बस पुणे - नगर या महामार्गावर धावली. पुण्यातून तत्कालीन कलेक्टरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यावर ही बस नगरच्या दिशेने रवाना झाली. तीचा पहिला थांबा शिरुर होता. या पहिल्या - वाहिल्या बसचे सारथ्य शिरुर येथील दत्तोबा पवार यांनी केले. तीन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.

रुर स्थानकावर या बसचे जल्लोषात स्वागत झाले. स्वागतासाठी खास वाजंत्री लावली होती. शिरुर स्थानकावर या एसटी बसला दोन्ही बाजूंनी ऊसाचे वाढे लावले होते व छोटा हार घातला होता. चालक दत्तोबा पवार यांचा स्थानकावर फेटा बांधून सत्कार देखील करण्यात आला होता. शिरुर शहर व परिसरात आज देखील एसटी मधे काम केलेले अनेक जूने कर्मचारी असून त्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. तसेच, शिरुर आगारातील पहिली एसटी चालविण्याचा मान येथील (स्व.) ज्ञानोबा शंकर ओतारी यांना मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT