सोलापूर : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून जमिनीची पाणीपातळी देखील जानेवारीच्या तुलनेत सध्या एक मीटरने खालावली आहे. गावागावातील हातपंप आता बंद पडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर टॅंकरची मागणी वाढत असल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या जिल्ह्यातील अकराशे गावांपैकी १०२ गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात माळशिरस, करमाळा, सांगोला या तालुक्यांमध्ये सर्वाधिक टॅंकर सुरु आहेत.
उजनी धरण सध्या उणे (मायनस) ४२ टक्के झाले असून नदी, ओढे, लघू- मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला असून बहुतेक प्रकल्प कोरडेठाक आहेत. विहिरींचे पाणी खोलवर गेले असून अनेकांच्या विहिरींचे पाणी बंद झाले आहे. अशा परिस्थितीत टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील गावागावांमधील पाणी टंचाईची तीव्रता भीषण होत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण सुरु झाली आहे. गावागावांत दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता तीन दिवसाआड झाला आहे.
दरम्यान, अनेक गावांनी टॅंकरची मागणी केली आहे, पण तत्पूर्वी त्यासंदर्भातील निकषांची काटेकोरपणे पडताळणी करूनच त्या गावांना टॅंकर दिला जात आहे. टॅंकर देण्याचे अधिकार सध्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मेअखेर जिल्ह्यातील टॅंकरची संख्या एक हजारांवर जाईल, अशी सद्य:स्थिती आहे.
‘या’ गावांमध्ये सध्या पाण्यासाठी टॅंकर
माळशिरस : भांब, पिंपरी, गारवाड, मगरवाडी, फडतरी, फडतरी (शिवारवस्ती व निटवेवाडी), कोथळे, बचेरी, माणकी, लोणंद, लोंढे मोहितेवाडी, सुळेवाडी, जळभावी, शिंगोर्णी, उंबरे दहिगाव, रेडे, गीरवी.
माढा : तुळशी, बावी, कुर्डू, शिराळ मा., परितेवाडी, वैरागवाडी, भोसरे.
करमाळा : घोटी, साडे आळसुंदे, फिसरे, सालसे, निबोरे, रायगाव, देलवडी, वरकुटे, पाथुर्डी, अंजनडोह, नेर्ले, तरटगाव, पाडळी, वीट, पांडे, धायखिंडी, मलवडी, केम, गौंडरे, श्री देवीचा माळ, सावडी, शेलगाव (क), बिटरगाव (श्री), कोर्टी, कुंभारगाव, पोंधवडी, पोथरे, वरकटणे.
मंगळवेढा : येड्राव, गणेशवाडी, भाळवणी, आंधळगाव, लक्ष्मीदहिवडी, सलगर खु., बावची, शिरनांदगी, शिवणगी, निंबोणी.
दक्षिण सोलापूर : कुंभारी, बंकलगी, दोड्डी, यत्नाळ, कणबस.
सांगोला : सोनलवाडी, बागलवाडी, लक्ष्मीनगर, कटफळ, अचकदानी, चिकमहुद, डोंगरगाव, य.मंगेवाडी, अजनाळे, लोटेवाडी, वासुद, ईटकी, पारे, महुद बु., चिनके, वाकी शिवणे, शिवणे, खवासपूर, सोमेवाडी, घेरडी, एखतपूर, मांजरी, कमलापूर, वाढेगाव, आगलावेवाडी.
बार्शी : धोत्रे, पिंपळगाव धस, गुळपोळी, कुसळंब, टोणेवाडी.
अक्कलकोट : सुलेरजवळगे
मोहोळ : शेटफळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.