drug smuggler lalit patil arrested by mumbai police from chennai pune sassoon hospital drug racket  
महाराष्ट्र बातम्या

Lalit Patil Arrested : मोठी बातमी! ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अखेर चेन्नईमधून अटक

रोहित कणसे

पुण्यातील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलीसांकडून तस्कर ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयातून फाररा झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील याचा शोध पोलीस घेत होते. त्यासाठी पोलीसांची दहा पथके देखील तयार करण्यात आली होती. अखेर रात्री चेन्नई येथे लपून बसलेल्या पाटील याला अटक करण्यात आलं आहे. यानंतर ललित पाटील याला पुण्यात आणलं जाणार असून त्यानंतर कोर्टात सादर केलं जाईल.

प्रकरण काय आहे?

पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात २ कोटी रुपयांचे ड्र्ग्ज सापडले होते.याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा फरार झासा होता. पोलिसांच्या नाकावर टिच्चून ललित पाटील फरार झाल्याने पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले जात होते.

ललित पाटील याला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. येथे ९ महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. पोलिसांनी चौकशीदरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक इथं ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचं समोर आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates Live : मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची संधी!

Akola Assembly Election 2024 : लोकसभेतील चूक विधानसभेत नको! काँग्रेस, वंचितचे नेते पराभवाची जबाबदारी स्वीकारतील काय?

IND vs NZ, Viral Video: सर्फराज खानच्या टणाटण उड्या, ऋषभ पंत काही लक्ष देईना; यात न्यूझीलंडचा किपरही गोंधळला

MUM vs MAH : मुंबईकर जोरात, प्रतिस्पर्धी कोमात! सर्फराजनंतर आणखी एकाची शतकी खेळी, Ayush Mhatreचे द्विशतक हुकले

Assembly Elections Explained: आदिवासी आमदारांकडे राज्याच्या सत्तेची चावी? भाजप अन् शिंदे गटासाठी व्होट बँक मोठे आव्हान!

SCROLL FOR NEXT