नवी दिल्ली : राज्यात सध्या ड्रग्जची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणानंतर अनेक प्रकरणं समोर यायला वेग आल्याचं चित्र आहे. यामागे खास मिशन असल्याचं समोर आलं आहे. खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Drugs Cases in Maharashtra come in light because of Devendra Fadnavis mission)
ड्रग्ज माफिया ललित पाटील दोन आठवड्यापासून फरार आहे. पण तो सापडेल जाणार कुठे? शोधून काढू त्याला, त्याचे जे साथीदार बंधू होते ते सापडलेत ना? ते ही सापडतील, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)
मी ज्यावेळी क्राईम कन्ट्रोल कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा सर्व युनिट्सला सांगितलं होतं की, आता आपलं टार्गेट ड्रग्ज आहे. त्यानंतर सर्वांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. सुरुवातीला मुंबईनं कारवाई सुरु केली त्यानंतर हलूहळू सर्वजण कारवाई करत आहेत, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)
केंद्र सरकारचंही यावर लक्ष आहे. जिल्ह्या जिल्ह्यात आम्ही ड्रग्जविरोधात समित्या तयार केल्या आहेत. त्या समित्या सातत्यानं काय कारवाई झाली याचं मॉनिटरिंग करतात. प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यंच्या अंतर्गत या समित्या नेमल्या आहेत.
त्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस आयुक्त असतील ते याचा भाग आहेत. पुढच्याही काळात अशाच कारवाया सुरु राहतील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी निवृत्तीनंतर आपल्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकातून खळबळजनक आरोप केला आहे. येरवडा इथं पोलीस दलासाठी राखीव ठेवलेला भूखंड तत्कालीन मंत्र्यांनी एका बांधकाम व्यवसायिकाला विकण्याचा घाट घातला होता, असं म्हटलं आहे. पुस्तकात त्यांनी संबंधित मंत्र्याचा नामोल्लेख टाळला.
या प्रकरणावर फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला याची कल्पना नाही. मी त्यांचं पुस्तक वाचलेलं नाही. याची कुठलीही माहिती माझ्याकडं नाही, असं उत्तर फडणवीसांनी दिलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.