पुणेः पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी हे सध्या जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. परंतू त्यांच्या विविध प्रोजेक्ट्समध्ये पैसा गुंतवलेल्या गुंतवणुकदारांना अद्याप त्यांचे पूर्ण पैसे मिळू शकलेले नाहीत. त्यामुळं गुंतवणुकदारांमध्ये नैराश्याचं वातावरणं आहे.
फेब्रुवारी २०१८मध्ये डीएसके, त्यांच्या पत्नी, मुलगा, मेव्हणे, जावई आणि कंपनीतीली लोकांना अटक करण्यात आलेली होती. ज्या कायद्यांतर्गत कारवाई झाली त्या कायद्यान्वये किती काळ तुरुंगात ठेवता, येतं हे कोर्टाने पाहिलं.
पाच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर डीएस कुलकर्णी काही महिन्यांपूर्वी जामिनावर तुरुंगाबाहेर आले. डीएसकेंच्या १३५ मालमत्ता आहेत. गृह प्रकल्प, मोकळ्या जागा, ड्रीम सीटी ३०० एकराचा प्रकल्प असेल यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र गुंतवणूकदारांचा एक रुपयाही परत मिळालेला नाही.
गुंतवणूकदारांना आक्षेप आहे की, डीएसकेंना अटक झाल्यानंतर त्यांच्या मालमत्ता कवडीमोल दराने खरेदी करण्याचा नवीनच घोटाळा सुरु झाला. कवडीमोल दराने मालमत्ता खरेदी करुन बँकांकडे पैसे वळते करायचे.
कारण डीएसकेंकडे वेगवेगळ्या बँकांचे १२०० कोटींचं कर्ज आहे. यामध्ये वेगवेगळ्या बँकांचा सहभाग आहे. एका राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्याला या प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करावा आणि लिलाव करुन गुंतवणूकदारांचे पैसे द्यावेत, अशी मागणी होत आहे.
आज डीएसकेंचे फोटो माध्यमांच्या हाती आले आहेत. त्यांना तब्बल पाच वर्षांनंतर जामीन मंजूर झालेला आहे. यापूर्वीही त्यांना जामीन मंजूर झालेला होता, परंतु त्यांची सुटका झालेली नव्हती. आता डीएसके बाहेर आलेले असल्याने गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.