Dairy Business esakal
महाराष्ट्र बातम्या

दुधापेक्षा शेणातून मिळतोय बक्कळ पैसा; मागणी वाढल्याने दरात तेजी, चारशे कोटींची उलाढाल शक्य

शेणखताला सोन्याचा भाव

रुपेश नामदास

पिंपळगाव बसवंत: यंदाच्या द्राक्ष हंगामाची सांगता बाजारभावाअभावी काहीशी निराशाजनक होत आहे. पण तरीही शेतकरी नाउमेद न होता पुढील हंगामाचे नियोजन करताना दिसत आहे. बागेतील द्राक्षकाढणीनंतर खरड छाटणीला वेग आला आहे. छाटणी होताच शेणखत टाकले जात आहे. सध्या या शेणखताला सोन्याचा भाव आला आहे.

एकवीस हजार रूपये ट्रक असा भाव सध्या शेणखत खात आहे. मुंबई व गुजरात येथून शेणखताचा पुरवठा होत असून नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागेचे क्षेत्र पाहता किमान चारशे कोटी रूपयांची उलाढाल शेणखतातून होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्याचे हुकमी पीक असलेल्या द्राक्षाने शेतकऱ्यांचा यंदा काहिसा अपेक्षाभंग केला. थोडा कालावधी वगळता बाजारभाव जेमतेम राहीले. काही शेतकऱ्यांचा तर खर्चही वसूल झाला नाही.

पण पुढील हंगामात दर मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी द्राक्षबागेच्या नियोजनाला सुरवात केली आहे. खरड छाटणीचे काम बागांमध्ये सुरू आहे. छाटणीनंतर द्राक्षाच्या झाडे व वेलीनां सशक्त बनविण्यासाठी शेणखताची मात्रा दिली जाते.

मुंबई, गुजरातमधून पुरवठा....

मुंबई, गुजरात येथे म्हशीचे मोठ्या प्रमाणात तबेले आहेत. नाशिक येथून भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रक परत येताना शेणखत घेऊन येतात. गुजरातपेक्षा मुंबईच्या शेणखताचा दर्जा चांगला असल्याने शेतकरी त्याला पसंती देतात.

सध्या दररोज पाचशे ट्रक शेणखत नाशिक जिल्ह्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात दीड हजार एकरवर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. खरड छाटणीनंतर एकरी किमान दोन ट्रक शेणखताचा डोस द्यावा लागतो. त्यामुळे किमान दोन लाख ट्रक शेणखताची गरज लागणार आहे.

दर किमान २१ हजार रूपये

सध्या शेणखताला सुरू असलेला २१ हजार रूपये प्रतिट्रक असा दर पाहता किमान चारशे कोटी रूपयांची उलाढाल शेणखतांच्या खरेदीतून होणार आहे. मुंबई, गुजरातच्या तबेल्याच्या मालकांशी संबध असलेले शेणखताचे पुरवठादार जिल्ह्यात आहेत.

शेणखत सरस ठरत असून उत्पादनात वाढ होण्यासह जमिनीची सुपिकता टिकून राहते. द्राक्षशेती तज्ज्ञही शेणखत वापरण्याची शिफारस करतात. त्यामुळे शेणखतांची मागणी वाढत असून दरवाढीमुळे शेणखताला सोनेरी दिवस आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT