माझ्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही तरी मी लढत आहे असे उद्धव ठाकरे मेळाव्यात म्हणाले
अदानीला सर्व काही दिलं. मी पैसे घेऊन गप्प बसत नाही. मी मुंबई, महाराष्ट्रासाठी लढत आहे असे उद्धव ठाकरे मेळाव्यात म्हणाले
राज्य माता गाय झालीय मात्र मग महिलांवरच्या अत्याचाराचे हंबरडे तुम्हाला ऐकू येत नाही का? आधी आईची रक्षा करा मग गाईला माता बनवा असे उद्धव ठाकरे म्हणाले
रोज मला शिव्या देत आहेत,पण तुमचे आशीर्वाद आहेत तोवर माझा कोणी बाल ही बाका करू शकणार नाही
आता समर्थ आणि समृद्ध राज्य करायचे आहे,राज्यात अनेक काम करायचे आहे
देशाला महासत्ता करण्यासाठी राज्याला पुढे ठेवायचे आहेत
भाजपला खांदा द्यावा लागेल यांची प्रवृत्ति संपवावी लागेल दसरा मेळाव्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले
सरकार आल्यावर प्रत्येकाची फाईल आपण काढणार. आपलं सरकार आल्यावर प्रत्येकाची फाईल आपण काढणार आहोत. अधिकारी असो किंवा राजकारणी ज्यांनी लूट केली त्यांना आत टाकणार असे आदित्य ठाकरे म्हणाले
भास्कर जाधव यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला.
स्वाभिमानी शिवसैनिकांना मानाचा मुजरा, शिवसैनिक कोणासमोर वाकत नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले
शिंदेंचा मेळावा सुरू होण्याआधीच शिवसैनिक मैदान सोडून निघाले.
शिवसैनिकांच्या बाहेर जाऊ नये, म्हणून गेट बंद केला आहे
त्यामुळे शिवसैनिक दुसऱ्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दसरा मेळाव्याला पोहोचले आहेत
उद्धव ठाकरेंचे धाकले चिरंजीव तेजस ठाकरे शिवाजी पार्कवर पोहोचले असून बाळासाहेब स्मृतिस्थळाचे त्यांनी दर्शन घेतले.
मोहन भागवत म्हणातात की, द्वेश संपवायला हवा. अशावेळी जर खरच द्वेश संपवायचा असेल तर हा सल्ला आधी फडणविसांना द्या. कोकणमध्ये न चालणारी चिल्लर राज्यात सभा घेत आहे. यामुळे द्वेश पसरत आहे. चाराणे बाराणे हिंदु मुस्लिम वाद लावतात. पण त्याला राज्यातली जनता बधली नाही
शिवसेना संपणार अस समजून अनेकांना आनंद झाला मात्र शिवसेना संपत नसते शिवसेना संपवत असते असं नितीन बानगुडे पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदेंचे शिवसैनिक मशाल घेऊन आले
कोल्हापुरातील ऐतिहासिक शाही दसरा काहीच वेळात सुरू होत आहे. कोल्हारातील दसरा चौक परिसरामध्ये दसरा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सहा वाजून 11 मिनिटांनी सूर्यास्तावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीचे पूजन करून सोनं लूटण्याचा सोहळा पार पडतो. यावेळी करवी निवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी गुरु महाराज यांची पालखी वाजत गाजत पारंपारिक पद्धतीने दसरा सोहळ्यासाठी आणण्यात येतात. तोफेची सलामी देत बंदुकीच्या फैरी देखील उडवण्यात येतात. मेबॅक कार मधून खासदार शाहू महाराज छत्रपती, युवराज संभाजी राजे, युवराज मालोजी राजे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्य दसरा चौकात दाखल होतात. असंख्य कोल्हापूरकरांच्या साक्षीनं मावळतीच्या किरणांसोबत दसरा चौक परिसरात सोने लूटण्याचा सोहळा पार पडतो. पावसाला सुरुवात झालेली आहे.
शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा एकच असतो आणि तो शिवतीर्थावर होतो, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
दसरा मेळाव्यात पहिल्यांदा युनासेनाप्रमुख आदित्य ठाकरे भाषण करणार आहेत. यावेळी . युवासेनेचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.
दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट दिसून येत आहे. मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यी युती झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले आहेत. गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडल्यानंतर धनंजय मुंडे पंकजा यांच्या मेळाव्याला जात नव्हेत. पण आज 12 वर्षांनी धनंजय मुंडे पंकजांच्या दसरा मेळाव्याला हजर होते.
शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या 'टिझर'मध्ये 'महाराष्ट्राचा एकमेव पारंपरिक दसरा मेळावा असल्याचा दावा करण्यात आला असून शिवसेनेकडून पुन्हा हिंदुत्वाची साद घालण्यात आली आहे.
सरकारने आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षण दिलं नाही, तर येत्या विधानसभा निवडणुकीत सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मनोज जरांगे पाटील यांच्या दसऱ्या मेळाव्यानंतर मराठा महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया.
आज नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांच्या तर भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या दोन्ही मेळाव्यांच्या शेवटी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पंकजा मुंडे यांनी आज भगवान गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरम्यान या मेळाव्यात पंकजा यांनी "मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ" असे म्हणत भाषणाला सुरुवात केली.
यावेळी आरक्षणाबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "आचारसंहिता लागेपर्यंत राजकारणाचा एक शब्दही बोलणार नाही तोपर्यंत मी वाट पाहाणार आहे. न्याय मिळाला नाही तर आचारसंहितेनंतर निर्णय घेणार आहे. तुमची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी, तुमची शान मी वाढवणारचं फक्त मी जे सांगेन ते पूर्ण क्षमतेने करायचे. आचारसंहिता लागायच्या आत आरक्षण द्या नाही तर तुमच्या नाकावर टिच्चून तुम्हाला उलथे केल्याशिवाय राहणार नाही."
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आज नारायण गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "मी ओरिजनल भक्त, ड्युप्लीकेट भक्त तिकडे आहेत. बुडबुडे फार दिवस टिकत नाहीत. आपण चालत राहायचं, तुमची लेकरं मोठी व्हावीत म्हणून मी सहन करतोय."
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आज दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळावत आता जरांगे यांचे भाषण सुरू झाले आहे.
मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलने करणारे मनोज जरांगे आज नारायणगडावर दसरा मेळावा घेणार आहेत. यासाठी ते नुकतेच भगवान गडावर दाखल झाले आहेत.
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले, "ही 50 वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. देशात फक्त 2 दसरा मेळावे प्रसिद्ध आहेत. एक शिवसेनेचा दसरा मेळावा जो बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला होता आणि दुसरा RSS चा दसरा मेळावा.
आता महाराष्ट्रातील डुप्लिकेट शिवसेना, मोदी-शहांची सेनाही शिवसेनेच्या नावाने दसरा मेळावा घेत आहे, इतर अनेक संघटनाही रॅली काढतात पण शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या मेळाव्याचे महत्त्व कायम आहे.
नवरात्री संपताच देशभरात दसऱ्याचा सण साजरा होत आहे. शहरातील प्रत्येक मैदानात रावणाचे पुतळे उभारले जात आहेत. सायंकाळी रावण दहन होईल. दिल्लीतील द्वारका सेक्टर 10 मध्ये रावणाचा सर्वात मोठा पुतळा बसवण्यात आला आहे.
संपूर्ण देश आज दसऱ्याचा सण साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत X हँडलवरून ट्विट केले आणि देशवासियांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
दसऱ्याच्या शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी लिहिले की, देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा. माँ दुर्गा आणि भगवान श्री राम यांच्या आशीर्वादाने, आपणा सर्वांना जीवनाच्या प्रत्येक पैलूत विजय प्राप्त व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.
आज विजयादशमी आणि दसऱ्यानिमित्त देशभरात उत्साह आहे. नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आणि पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रावण दहन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.
ठाकरे गटाचा पारंपरिक दसरा मेळावा आज शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. मात्र मुंबईत पावसाने जोर धरल्याने शिवाजी पार्क मैदानात चिखलाचे साम्राज्य निर्माण झालं आहे.
विजयादशमीनिमित्त नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्रोचे माजी प्रमुख के सिवन उपस्थित होते. पद्मभूषण आणि इस्रोचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन हे देखील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख
नागपुरात विजयादशमीच्या निमित्ताने आरएसएसच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्रोचे माजी प्रमुख के सिवन उपस्थित होते. पद्मभूषण आणि इस्रोचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन हे देखील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी महत्त्वाचा मानला जाणारा विजयादशमी उत्सव आज आयोजित करण्यात आला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. राधाकृष्णन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरातील रेशम बाग मैदानावर शस्त्रपूजन होणार आहे.
आसाममधील गुवाहटी येथे विजयादशमीनिमित्त माँ कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी नागपूर येथे 'पथ संचलन' आयोजित केले होते. यावेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवत हेही उपस्थित होते.
यंदाच्या दसऱ्यानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे दसरा मेळावे होणार आहेत. हा दसरा खास असणार आहे कारण येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कोण काय बोलते याकडे संपूर्ण राज्याचेल लक्ष लागले आहे.
आज राष्ट्रीय संवयंसेवक संघाचा नागपूरमध्ये, मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावर, पंकजा मुंडेंचा भगवान गडावर आणि दोन्ही शिवसेनेचे मुंबईत दसरा मेळावे होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.