E-Peek Pahani news in marathi esakal
महाराष्ट्र बातम्या

E-Peek Pahani Online: मोबाइलवरून कशी कराल ई पीक पाहणी? शेतकऱ्यांनो ही बातमी वाचा नाहीतर सरकारी मदतीपासून राहाल वंचित

Government Schemes Farmers: तुम्हाला पीक विमा किंवा नुकसान भरपाई हवी असेल तर ई-पीक पाहणी करावी लागणार आहे. आपल्या शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्याला सातबारा उताऱ्यावर वस्तुनिष्ठ अचूक आणि पारदर्शक नोंद व्हावी, याकरता राज्यात ई-पीक पाहणी उपक्रम राबवण्यात येतो.

Sandip Kapde

E-Peek Pahani Online Maharashtra

आपल्या शेतात पिकलेल्या मालाची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षांपासून ई पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यंदा पीक पाहणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विमा पासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केली असून 1 ऑगस्टपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे, तर 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ही नोंदणी करता येईल. त्यामुळे सर्वांनी मुदतीच्या आत पीक पाहणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पीक विमा व नुकसान भरपाईसाठी आवश्यक-

तुम्हाला पीक विमा किंवा नुकसान भरपाई हवी असेल तर ई-पीक पाहणी करावी लागणार आहे. आपल्या शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्याला सातबारा उताऱ्यावर वस्तुनिष्ठ अचूक आणि पारदर्शक नोंद व्हावी, याकरता राज्यात ई-पीक पाहणी उपक्रम राबवण्यात येतो.

मोबाइलवरून पीक पाहणी कशी करावी?-

पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. एका मोबाइलवरून ५० पीकपेरा नोंदणी शक्य आहे. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचा मोबाइल शेतात चालत नसेल, तर अन्य शेतकऱ्याच्या मोबाइलवरूनही नोंदणी करू शकतील. खरीप हंगाम २०२४ साठी पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे अपडेटेड व्हर्जन ३.०.१ ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नोंद कशी करावी?-

  • डावीकडे दोन वेळा स्क्रोल केल्यानंतर निवडा या पर्यायाच्या ठिकाणी विभाग निवडा.

  • शेतकरी म्हणून लॉगइन केल्यानंतर वरीलप्रमाणे पर्याय दिसतील.

  • गट क्रमांक टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव समोर येईल. खाते क्रमांक तपासून आपला मोबाईल क्रमांक टाका. एसएमएसद्वारे चार अंकी पासवर्ड येईल, तो काय लक्षात ठेवा.

  • त्यानंतर होम पेजवर येऊन पिकाची माहितीसाठी हा फॉर्म भरता येईल. त्यानंतर कॅमेरा पर्याय येईल, त्याद्वारे फोटो काढून फॉर्म सबमिट करा.

  • बांधावरील झाडांची माहिती नोंदविण्यासाठी असे पर्याय उपलब्ध आहेत.

  • ॲप्लिकेशनच्या नव्या व्हर्जनमध्ये शेतकरी आपल्या नोंदीत 48 तासात केव्हाही एका वेळेस दुरुस्ती करू शकतो.

  • शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेत नोंद करायची का, असा प्रश्न विचारला जातो. तशी नोंदही आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकते.

  • यापूर्वी एक मुख्य आणि दोन दुय्यम पिके नोंदवता येत होती. आता तीन दुय्यम पिके क्षेत्रासह नोंदवणे शक्य आहे.

ई-पीक पाहणीचे फायदे-

  • पीक पाहणीमुळे पीक कर्ज देणे, पीक विमा भरणे किवा पीक नुकसानभरपाई शक्य होणार आहे.

  • ई-पीक पाहणी ॲपमध्ये नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावता येणार आहे.

  • राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला, हे अचूक समजणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut: महाराष्ट्राचा निकाल लागताच कंगनानं उद्धव ठाकरेंना दैत्य संबोधलं! म्हटलं...

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: पहिला दिवस संपला! स्टार खेळाडूंनी भाव खाल्ला; अनेक खेळाडू झाले मालामाल

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

IND vs AUS 1st Test: ४ बाद, १७ धावा! टीम इंडियाचा दरारा; ऑस्ट्रेलियात मोडला ११३ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

SCROLL FOR NEXT