ST Bus (file photo) esakal
महाराष्ट्र बातम्या

एसटी प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढण्याची सोय! राज्य परिवहन महामंडळाची ऑनलाइन आरक्षण प्रणाली; ‘या’वरून काढता येईल प्रवाशांना एसटी बसचे तिकीट

तात्या लांडगे

सोलापूर : जानेवारी २०२४ पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी ऑनलाइन आरक्षण प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना घरबसल्या एसटीचे आरक्षित तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने npublic.msrtcors.com अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ऑनलाइन तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पाच महिन्यांत राज्यातील १३ लाखांहून अधिक तिकिटाची विक्री या ऑनलाइन आरक्षण प्रणालीतून झाली आहे. मागील वर्षी या पाच महिन्यांत पावणेदहा लाख तिकिटांची विक्री झाली होती.

सोलापूरसह राज्यभरातील १० हजार प्रवासी दररोज या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेत आहेत. दरम्यान, मोबाईलवर MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढता येते. या दोन्ही पद्धतीने तिकीट काढण्याच्या प्रणालीत बदल करून ते अद्ययावत करण्यात आले आहे. कोणत्याही प्रवाशाला मोबाईलद्वारे घरबसल्या सहजपणे ऑनलाइन आरक्षण प्रणालीद्वारे तिकीट काढता येईल, अशी सोय त्यात करण्यात आली आहे.

ऑनलाइन प्रणालीद्वारे अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्तींना देखील सवलतीतून आगाऊ आरक्षणाचे तिकीट मिळू शकते. त्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.

अडचण आल्यास ‘या’ क्रमांकावर करा संपर्क

एसटी बसचे ऑनलाइन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. हा क्रमांक प्रवाशांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास उपलब्ध असणार आहे. तसेच ऑनलाइन आरक्षण करताना पैसे भरून देखील तिकीट न मिळाल्यास (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी ०१२०-४४५६४५६ हा क्रमांक महामंडळाने प्रवाशांसाठी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT