नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता अजित पवारांनी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली असून ही याचिका आयोगाला प्राप्त झाली आहे. या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाची निशाणी घड्याळ या दोन्हींवर दावा सांगण्यात आला आहे. (ECI has received petition from Ajit Pawar staking claim to NCP and party symbol)
खळबळजनक बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या दोन दिवस आधीच ही याचिका अजितदादांच्यावतीनं निवडणूक आयोगाकडं दाखल करण्यात आली होती. तसेच या याचिकेसोबत दिलेल्या पत्रात ४० आमदारांच्या सह्या असल्याचं समोर आलं आहे. तसेच अजितदादांच्या ठरावात अजित पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असा उल्लेखही या याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या दोन भिन्न ठिकाणी बैठका पार पडल्या. यामध्ये एमईटी इन्स्टिट्युटमध्ये अजितदादांच्या गटाची बैठक झाली तर वायबी सेंटरमध्ये शरद पवारांनी बैठक बोलावली होती. यामध्ये दोन्ही बाजुंकडून आपली बाजू मांडताना दोन्ही नेत्यांवर कडाडून टीका करण्यात आली. अजितदादांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत आपल्या समर्थकांसह रविवारी सत्तेत सामिल झाले तसेच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर इतर आठ जणांनी देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.