ED Arrested Two Minister of Thackeray Government e sakal
महाराष्ट्र बातम्या

तिसऱ्या वर्षात ठाकरे सरकारला डबल दणका; दोन मंत्री ईडीच्या अटकेत

भाग्यश्री राऊत

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेला तिसरं वर्ष सुरू आहे. पण, या तीन वर्षांत या सरकारमधील काही मंत्री वादात सापडलेत. अनेकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला. ठाकरे सरकारच्या (Uddhav Thackeray Government) दुसऱ्या वर्षात पहिल्या मंत्र्याला ईडीने अटक केली. त्यानंतर आज तिसऱ्या वर्षात दुसऱ्या मंत्र्यांना अटक करत ईडीने महाविकास आघाडी सरकारला डबल दणका दिला आहे. (ED Arrested Two Minister of Thackeray Government)

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांमागे तपास यंत्रणांच्या चौकशीचा फेरा लागला. यामध्ये अनिल देशमुख, अनिल परब, खासदार भावना गवळी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय, संजय राऊतांचे निकटवर्तीय या सर्वांवर ईडीने छापेमारी केली. मात्र, यामध्ये विकेट पडली ती अनिल देशमुखांची. अनिल देशमुखांवर शंभऱ कोटी वसुलीचे आरोप झाले आणि त्यांच्यामागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या तपास यंत्रणांची चौकशी लागली. अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख १ नोव्हेंबर २०२१ ला चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झालेत. त्यानंतर अनिल देशमुखांची १२ तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी करत त्यांना २ नोव्हेंबरला मध्यरात्री अटक करण्यात आली. सध्या अनिल देशमुख तुरुंगात आहेत.

तिसऱ्या वर्षात दुसऱ्या मंत्र्याला अटक -

नवाब मलिकांनी ईडीसह एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप केले. वानखेडेंचे अनेक घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगितले. त्यानुसार वानखेडेंची चौकशी देखील झाली. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना माझ्यावर ईडीची कारवाई होईल, असं भाकीत मलिकांनी वर्तविलं होतं. त्यानुसार आज मध्यरात्री मलिकांना त्यांच्या घरातून ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. तब्बल ८ तास चौकशी केल्यानंतर ईडीनं मलिकांना अटक केली. एक मंत्री तुरुंगात असताना दुसऱ्या मंत्र्यांना अटक केल्यानं महाविकास आघाडी सरकारवर मोठं संकट ओढवलं आहे.

आतापर्यंत या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा -

आतापर्यंत शिवसेनेच्या चार नेत्यांना ईडी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले. तसेच संजय राऊतांच्या कुटुंबीयांच्या मागे देखील ईडी चौकशीचा फेरा लागला आहे. सध्या शिवसेनेचे चार नेते ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यामध्ये मंत्री अनिल परब, आनंदराव अडसूळ, प्रताप सरनाईक आणि खासदार भावना गवळींच्या समावेश आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांमागेही तपास यंत्रणा -

ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपूर्वी चौकशीसाठी बोलावले होते. मी चौकशीसाठी जाणार, असं पवारांनी सांगितलं होतं. पण, शेवटी ईडीने चौकशी करणार नाही, असं म्हटलं. त्यानंतर अनिल देशमुखांवर ईडीने कारवाई केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर देखील ईडी आणि आयकर विभागाने छापेमारी केली. एकनाथ खडसेंची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT