dhananjay munde sakal media
महाराष्ट्र बातम्या

Sakal Impact : द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मिळणार वसतीगृहात प्रवेश

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले निर्देश

संजीव भागवत

मुंबई : कोरोनामुळे मागील सन 2020-21 मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना (First year student admission) शासकीय वसतीगृहात (Government hostel) प्रवेश घेता आला ‍नाही, अशा विद्यार्थ्यांना आता द्वितीय वर्षांत (second year) वसतीगृहात प्रवेश दिला जाणार आहे, यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सामाजिक न्याय विभागाच्या असलेल्या नियमावलीतच बदल करून पदवी, पदव्युत्तर आदी सर्व अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षातील गुणवत्ताधारक आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठीचा जीआर १० डिसेंबर रोजी जारी केला जाणार आहे.

मागील वर्षी प्रथम वर्षात असलेल्या विद्यार्थ्याना द्वितीय वर्षांत वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी अर्ज उपलब्ध करून दिले जात नाहीत, त्यासाठी कोणतीही नियमावली नसल्याचे कारणे अधिकारी देत असल्याने हजारो विद्यार्थी संकटात सापडले असल्याचे वृत्त 'सकाळ' ने द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अर्ज मिळेनात: वसतीगृह प्रवेशाचे आव्हान या मथळ्याखाली गुरूवारी, ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री मुंडे निर्देश दिले आहेत.

मुंडे यांच्या या निर्देशामुळे राज्यातील हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून मुंडे यांच्या या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे, ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार यासंदर्भातील शासन परिपत्रक १० डिसेंबर रोजी जारी केला जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मागील काळात कोविड विषयक निर्बंधांमुळे शाळा-महाविद्यालये बंद होती व ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते. त्यामुळे याकाळात सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे बंद होती.

दरम्यान आता शाळा - महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ऑनलाईन काळात प्रथम वर्षाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षासाठी वसतिगृह प्रवेश मिळण्यास मध्यंतरीच्या अटीमुळे बाधा येत होती. धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना आता द्वितीय वर्षात गुणवत्तेनुसार वसतिगृहात थेट प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : मुंबईवर कोणी हल्ला केला तर मोदी त्यांना पातळातूनही शोधून काढेन, सोडणार नाही - मोदी

SCROLL FOR NEXT