महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: विधानसभेत शिदेंना हव्या आहेत इतक्या जागा, अमित शहांकडे केली मागणी

सकाळ वृत्तसेवा

Mahayuti: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला किमान ९० जागा लढायला मिळाला हव्यात, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असल्याचे समजते.

लोकसभेतील यश लक्षात घेता शिवसेनेला १०० जागा मिळाल्या पाहिजेत; मात्र युतीधर्म लक्षात घेता ९० जागांपर्यंत आम्ही विचार करू, असे शिंदे यांच्या एका अत्यंत विश्वासू सहकाऱ्याने 'सकाळ'ला सांगितले. नक्षलवादासंदर्भातील बैठकीसाठी दिल्लीत आलेल्या शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.

महायुती सरकारचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे आता लोकप्रिय झाले असून 'लाडकी बहीण' योजनेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली आहे. गावोगावी भेटी, जिल्ह्यांमध्ये संपर्क यंत्रणा जागी ठेवणे, तसेच

महायुतीतील भारतीय जनता पक्षाला अभिप्रेत असलेले विषय प्रत्यक्षात आणणे अशी सर्व कामगिरी बघितली असता शिंदे यांना ९० जागा मिळायलाच हव्यात, असे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. या जागा प्रामुख्याने मराठवाड्यातील, मुंबई परिसरातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील असाव्यात, अशीही शिंदे यांची भूमिका आहे.

आज दिल्ली येथे नक्षलवादाविषयी झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षबदल केलेल्या सर्व आमदारांना उमेदवारी दिली जाणार आहे, तसे आश्वासन भाजपने दिले आहे; मात्र त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाची लोकप्रियता लक्षात घेता जागांची संख्या किमान ९० पर्यंत असायला हवी, असे

'भाजप छोटा भाऊच असावा'

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या सर्व जागा शिवसेनेलाच मिळाल्या पाहिजेत, या जागा मिळाल्या तर त्याचा यशासाठी योग्य उपयोग करता येईल, अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी सादरीकरणाद्वारे त्यांचा जोर कुठे आहे, याची माहिती अमित शहा यांना दिली आहे. युतीमध्ये भाजप पूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत छोट्या भावाची भूमिका बजावायचा, हेच सूत्र कायम ठेवायला हवे, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या काही आमदारांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinesh Phogat : "काँग्रेसचा बदला घेण्यासाठी 'इंडिया'शी गद्दारी; विनेश विरोधात देखील..."; स्वाती मालीवाल यांचे गंभीर आरोप

Instagram Outage in India: भारतात इंस्टाग्राम झाले डाऊन; लाखो वापरकर्त्यांची तक्रार,नेमकं कारण काय?

Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE: हरियानात मोठी उलथापालथ, बघता बघता भाजपने टाकले काँग्रेसला मागे

IND vs BAN 2nd T20I : इंडिया की शान, सूर्यकुमार! दिल्लीत पोहोचताच SKYचा भन्नाट डान्स, Video

Prashant Kishor Prediction: प्रशांत किशोर हरियानातील निवडणुकीपूर्वी भाजपबद्दल काय म्हणाले होते? किती ठरले खरे?

SCROLL FOR NEXT