मुंबई - माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच फडणवीस हेसुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. त्यानतंर आता एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. एकनाथ खडसे यांनी ही भेट सदिच्छा असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तब्येतीची विचारपूस केली अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेसुद्धा उपस्थित होते.
खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चा होण्याचं कारण म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रक्षा खडसेंची भेट घेतली होती. तसंच, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. फडणवीस यांनीसुद्धा ही भेट सदिच्छा असल्याचंच सांगितलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.