Eknath Khadse Gulabrao Patil reach settlement in defamation case jalgaon Politics  
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse : मुख्यमंत्री दौरा अन् एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांची हातमिळवणी! न्यायालयातील प्रकरणात झाला अखेर समझोता

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांच्यात समझोता झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमधील एक खटला न्यायालयात सुरु होता. मात्र आता या दोन नेत्यात तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यामान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २०१६ साली केलेल्या वक्त्यव्याविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता. गुलाबराव पाटील यांनी खडसे यांच्यावरिल भ्रष्टाचाराच्या आरोपांसंबंधीत एक वक्तव्य केलं होतं. यावरून हा खटला दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात समेट झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यायलयात सुरू असलेल्या या खटल्यात दोन्ही नेत्यांनी तडजोड करून हे प्रकरण मिटवण्यात आलं आहे.

जळगावात मुख्यमंत्र्यांना दाखवणार काळे झेंडे!

एकीकडे एकनाथ खडसे यांनी एकनाथ शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांच्याशी समझोता केला आहे, मात्र आज जळगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यावर ते ठाम आहेत.

आज जळगावमध्ये शिंदे-फडणवीस सरकारकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम जळगावमध्ये होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात एकनाथ खडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यावर ठाम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: अजितदादांच्या खांद्यावर नरेश अरोरांचा हात... मिटकरींचा पक्षाला घरचा आहेर, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली?

Latest Marathi News Updates : इव्हीएमविरोधात लढाईसाठी विरोधकांची रणनीती

Nashik News : नवीन डांबरीकरण झालेले रस्ते खोदाईस मनाई; जुन्या खोदलेल्या रस्त्यांचा मागविला अहवाल

Hasan Mushrif : कागलमधून हसन मुश्रीफ विजयी झाले, पण..; काय सांगते मतदारसंघातील आकडेवारी, घाटगे पोहोचले जवळपास

Rajkumar Rao Fees: स्त्री २'च्या यशानंतर राजकुमार रावने वाढवली फी? ५ कोटींच्या चर्चेवर दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT