Udayanraje Bhosale Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

खासदार उदयनराजेंची 'ती' मागणी CM शिंदेंनी केली मान्य; आता होणार स्वतंत्र महामंडळ

अजिंक्यतारा राजधानी असतानाच मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकविण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

अजिंक्यतारा राजधानी असतानाच मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकविण्यात आला होता.

सातारा : शिवकालीन गडकोट किल्ले, वास्तू आपल्या पूर्वजांच्या शैार्याची आणि पराक्रमाची यशोगाथा सांगतात. युगपुरुष शिवशंभू राजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असणाऱ्या वास्तूंच्या जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी शिवनेरी, प्रतापगड, अजिंक्यतारा (Ajinkyatara) येथे रोप-वेसह, परिसर विकास साधण्‍यासाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्‍याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडं आम्ही केली होती. यानुसार शिंदे यांनी गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापना करण्याची केलेली घोषणा आमच्यासह अनेकांच्या प्रयत्नांना यश देणारी असल्‍याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान

पत्रकात म्‍हटलं आहे, की मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्‍ही ता. १० सप्‍टेंबर रोजी गडकोट, शिवकालीन वास्तूंच्या संवर्धन, जतन करण्‍यासाठी प्राधिकरण स्‍थापण्‍याची मागणी निवेदनाद्वारे आम्‍ही केली होती. मराठ्यांचा अजरामर इतिहासाची साक्ष असणारे गडकोट किल्ले यांच्या संरक्षणाची शिवप्रेमींप्रमाणेच राज्य सरकारचे पहिले कर्तव्य आहे, असे आमचे मत आहे. शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्मस्थान असून, त्‍यासह किल्ले प्रतापगड, किल्‍ले अजिंक्‍यतारा येथेही रोप वे आवश्‍‍यक असल्‍याचे आम्‍ही निवेदनात नमूद केले होते.

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन

अजिंक्‍यताऱ्याबरोबरच राजगड, रायगड (Raigad) येथे तत्‍कालीन मराठी साम्राज्‍याच्‍या राजधान्‍या होत्‍या. अजिंक्यतारा राजधानी असतानाच मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकविण्यात आला होता. हे किल्‍ले, गडकोट व वास्तूंच्या पडझडीबाबत आम्‍ही नुकतीच श्री. शिंदे यांची भेट घेत शिवनेरी, प्रतापगड, अजिंक्यताऱ्यासह गडकोट, किल्ल्यांच्या संरक्षण आणि संवर्धन विकासाबाबत स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्‍याबाबत चर्चा केली होती. चर्चेनुसार श्री. शिंदे यांनी गटकोट-किल्ल्यांच्या विकासाकरिता स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा आमच्‍या, तसेच शिवप्रेमींच्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ देणारी बाब असल्‍याचे मत उदयनराजेंनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : राहुल गांधींचं पुन्हा खटाखट... ! राज्यात महिलांसाठी महिन्याला 3,000 रुपये अन् मोफत एसटी प्रवासाची घोषणा

Bulldozer Action: ज्यांची घरे बुलडोझरने पाडली त्यांना 25 लाखांची भरपाई द्या ! योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका

Maharashtra Election 2024: मविआनं जाहीर केली ‘लोकसेवाची पंचसुत्री’; ‘या’ पाच गोष्टींची दिली हमी

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अरुणकुमार सिंग शरण

Latest Marathi News Updates live: ही निवडणूक महाराष्ट्राचं गुजरातीकरण थांबवण्यासाठी- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT