Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

शिंदे-फडणवीस दिल्लीत.... अजित पवार पुन्हा नाराज? राजकीय घडामोडींना वेग

Sandip Kapde

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीत रवाना झाले आहेत. तर महाराष्ट्रात अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे-फडणवीस अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

देवगिरी बंगल्यावर तातडीची बैठक-

राज्यात अजित पवार यांनी तातडीने देवगिरी बंगल्यावर बैठक बोलावली आहे. मुंबईतील भाजपच्या कार्यक्रमात महायुतीत भाजप मोठा भाऊ असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीत अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित -

अजित पवार हे आज (मंगळवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील गेले नाहीत. अजित पवार हे आजारी असल्याचे कारण देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादा नाराज असल्याचे सांगितले. मात्र अजितदादा नाराज आहेत की आजारी आहेत?, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

अजित पवार जीएसटी कौन्सिल बैठकीला देखील जाणार नाहीत?

अजित पवार ७ तारखेला जीएसटी कौन्सिल बैठकीला देखील दिल्लीला जाणार नाहीत, अशी माहिती समोर येते आहे. अजित पवार यांची नाशिकमध्ये नियोजित सभा असल्याचे बोलले जात आहे. मात्र राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. साम टिव्हीने याबाबत माहिती दिली आहे.    

सरकारमधील एक गट नाराज -

तर सरकारमधील एक गट नाराज असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. "३ महिने झाले ट्रिपल इंजीन सरकार येऊन पण या सरकारमधील एक घटक देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटला आहे. कारण त्यांची नाराजी आहे. तीन महिने झाले हनिमून संपला नाही आणि यांची नाराजी सुरु झाली", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.  

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणीची दिल्लीत बैठक -

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणीची ५ ऑक्टोंबरला दिल्लीत बैठक होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार या बैठकीतून संबोधित करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Aadhaar Update : अलर्ट! आधार कार्ड अपडेटच्या नियमात मोठा बदल; हे कागदपत्र नसेल तर बदलता येणार नाही माहिती

Kamthi Assembly Election 2024 : कामठीमधील १७ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त...निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मते घेण्यात ठरले अपयशी

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं...

Stock Market: महाराष्ट्रात भाजपच्या विजयानंतर अदानी शेअर्समध्ये तुफान वाढ; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीत

SCROLL FOR NEXT