महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : मिंधे गटाच्या पायाखालची सतरंजी ओढली जातेय; फडणवीस केवळ...; शिवसेनेची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र अधिवेशनापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी केलेलल्या विधानामुळे राजकारण तापलं आहे. देवेंद्र फडणवीसच आपले पुढचे मुख्यमंत्री असं विधान बावनकुळे यांनी केलं होतं. यावरून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे. (Eknath Shinde news in Marathi)

शिवसेनेने म्हटलं की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी वापरलेलं 'आमचे पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच', म्हणण्याचा अर्थ स्पष्ट आहे की मिंधे सरकारच्या पायाखालची सतरंजी ओढली जात आहे. फडणवीस वगैरे लोक सरकार आणि शिंदे यांच्या बाजूने लढत असल्याचं दाखवत आहेत, पण ते केवळ आव आणत आहेत. दुसरं म्हणजे बावनकुळे हे फडणवीसनिष्ठ आहेत. त्यामुळे ते फडणवीसांच्या मंजुरीशिवाय ते कसकाय मुख्यमंत्रीपदाबाबत बोलू शकतील, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत बरेच काही घडणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सरकार डामडौल असून बावनकुळे यांनी तसा फटाका फोडला असून भाजपकडून मनावरील दगड दूर करण्याचे काम सुरू झाल्याचंही सामनात म्हटलं आहे.

एकंदरीत भाजप नेत्यांकडून मागील काही दिवसांत मुख्यमंत्रीपदाबाबत करण्यात आलेल्या विधानांवर शिवसेनेने टीका केली आहे. त्यातच सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे हा हल्ला आणखी तीव्र झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकार फेब्रुवारी महिला पाहू शकणार नाही, असं म्हटलं होतं. तेव्हापासून शिंदे सरकार कोसळणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

Imtiaz Jaleel : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतांच्या फुटीचा जलील यांना फटका

Devendra Fadnavis : फडणवीस यांचा विजयी ‘षटकार’

SCROLL FOR NEXT