eknath shinde  sakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi Classical Language: एका लढ्याला यश...! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Marathi Classical Language: शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्याबरोबरच केंद्र सरकारने गुरुवारी मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे.

Vrushal Karmarkar

केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मंजुरी दिली. यामुळे अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या भाषांची एकूण संख्या सहापासून अकरा पर्यंत जवळपास दुप्पट झाली आहे. तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या आधीपासून हा दर्जा असलेल्या भाषा होत्या. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!

अजित पवार म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयानं जगभरातील मराठी भाषिक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची गेल्या अनेक दशकांची मागणी होती. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहोचेल, मराठी भाषा ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल. महाराष्ट्रासाठी हा अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार मानतो. समस्त महाराष्ट्रवासीयांचे, मराठी भाषिकांचे, मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT