eknath shinde 
महाराष्ट्र बातम्या

SuperFast CM : मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग संदेशला अवघ्या काही मिनिटांतच पाच लाखांची मदत

Sandip Kapde

मुंबई : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. दरम्यान भेटीसाठी आलेल्या बांधकाम मजूर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोले याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत केली. एकनाथ शिंदे यांनी काही मिनिटात पाच लाखांचा धनादेश संदेशला दिला. त्यामुळे संदेशच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात बैठकीसाठी आल्यावर त्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सामान्य नागरिक येत असतात. यावेळी शिंदे नेहमी आढावा बैठकांमधून प्रशासनाला निर्देश देत असतात.

आज दुपारी बाराच्या सुमारास एकनाथ शिंदे मंत्रालयात आले होते. यावेळी काही लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक देखील त्यांना भेटायला आले होते. या गर्दीत पालघर जिल्ह्यातील जव्हारचा संदेश पिठोले त्याच्या वडिलांसह मुख्यमंत्र्यांना भेटायला आला होता.

मुख्यमंत्र्यांचे लक्ष व्हीलचेअरवर बसलेल्या संदेशकडे गेले. विधि व न्याय विभागाच्या आढावा बैठकीसाठी जात असताना संदेशजवळ थांबून मुख्यमंत्र्यांनी त्याची विचारपूस केली आणि ते समिती कक्षात आले. विधी व न्याय विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी त्या संदेशला बोलावले. त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी संदेशला तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले. तत्काळ संपूर्ण प्रक्रिया झाली. धनादेशावर संबंधित अधिकाऱ्यांनी तिथेच मुख्यमंत्र्यांसमोरच स्वाक्षरी केली आणि संदेशच्या हातात पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला. (Latest Marathi News)

बांधकाम मजूर असलेल्या संदेशचा कामावर असताना अपघात झाला. त्यात त्याचा एक हात आणि दोन्ही पाय गमावले. मुख्यमंत्र्यांनी संदेशला कृत्रिम पाय, हात बसविण्यासाठी वैद्यकीय सहायता कक्षाला सूचना केल्या. तसेच व्यवसायासाठी स्टॉल सुरू कर. त्यासाठी पालघर येथे जागा देण्यासाठी मदत करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kankavli Politics : नीतेश राणेंविरोधात 'मविआ' कोणाला उतरविणार रिंगणात; उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम, 'ही' नावं चर्चेत

Latest Maharashtra News Updates : Canada Politics Live: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्याच लोकांनी घेरले

Chutney Store Tips: घरी बनवलेल्या चटण्या दिर्घकाळ राहतील चांगल्या, फक्त 'या' टिप्स करा फॉलो

Aadhaar Update : आधार कार्डवरील ही माहिती कधीच बदलू नका; अपडेट करताना घ्या काळजी,नाहीतर होईल पश्चाताप

Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला, निफ्टी 24,500 च्या खाली

SCROLL FOR NEXT