Eknath Shinde may use Sharad Pawar Loksabha formula in upcoming assembly elections politics news  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Formula : शिंदे वापरणार शरद पवारांचा फॉर्म्युला? विधानसभेत विजयासाठी आखली खास रणनीती

Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यादरम्यान राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

रोहित कणसे

आगामी विधानसभा निवडणुक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यादरम्यान राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच राज्यात महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. यादरम्यान या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खास रणनीती आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेसाठी शिंदे गटाकडून शरद पवार फॉर्म्युला वापरला जाणार आहे.

या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लिमिटेड जागांवर लक्ष केंद्रित करण्याची योजनाआखण्यात आली आहे. विधानसभेसाठी 100 जागांची तयारी शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली आहे. आज वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक पार पडली, ज्यामध्ये विधानसभेच्या फक्त १०० जागांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी राज्यातील शंभर जागा निवडल्या असून त्या जागांवर जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या जागांवर निरीक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. महिला आघाडीसंदर्भातील पदे देखील भरण्यास सांगण्यात आले आहे.

काय आहे शरद पवार फॉर्म्युला?

काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने केवळ दहा जागा लढवल्या होत्या. या दहा पैकी आठ जागा शरद पवार यांच्या पक्षाने जिंकल्या होत्या. त्याचप्रमाणे लिमिटेड जागांवर लढून त्याच ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates live : बाळासाहेब ठाकरे पुतळ्याला शिवसेना (उबाठा) पक्षाचे अभिवादन

SCROLL FOR NEXT