Uday Samant Nilesh Rane 
महाराष्ट्र बातम्या

Nilesh Rane: संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी करू; निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत सामंत यांची प्रतिक्रिया

कार्तिक पुजारी

मुंबई- निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निलेश राणे हे कोकणातले लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणारे एक चांगले युवा नेते आहेत. त्यांच्याबाबत आज राणे साहेब आणि मुख्यमंत्री यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. फक्त निलेश राणे विधानसभा निवडणुकीला उभे राहणार आहेत इतकंच मला माहीत आहे. याबाबतीत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

निलेश राणे यांनी असा निर्णय घेतल्यास महायुतीची संपूर्ण ताकद आपण त्यांच्या मागे उभी करू. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी घ्यायचा आहे. निलेश राणे यांनी असा निर्णय घेतल्यास त्यांच्या मागे सर्व ताकद उभी करण्याची जबाबदारी कोकणातील शिवसैनिकांची असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. मात्र, या मतदासंघावर निलेश राणे यांच्यासाठी भाजपाचा दावा आहे. त्यामुळे निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून कुडाळ-मालवणचे उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आज नारायण राणे आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत निलेश राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची आणि हा तोडगा निघाल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ, तुतारी हाती घेण्याचं बड्या नेत्यानं केलं निश्चित, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु

Badlapur School Crime: कोर्टानं कालच अटकपूर्व जामीन फेटाळला अन् आज शाळेच्या दोन्ही फरार विश्वस्तांना झाली अटक

Mohammad Shami: हात जोडून विनंती करतो...! मोहम्मद शमी संतापला, 'त्या' वृत्ताचा केला इन्कार

Pune Crime: पुण्यात भयंकर प्रकार! बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण, अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

Pune Crime : सोमवार पेठेतील शाळेतून दोन मुली बेपत्ता; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT