Eknath Shinde News 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde News: फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता; फोन टॅपिंग प्रकरणावर CM शिंदेंचे वक्तव्य

Sandip Kapde

Eknath Shinde News: फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. न्यायालयाने हा रिपोर्ट स्विकारला आहे. या रिपोर्टमध्ये महत्वाचे दावे करण्यात आले आहेत. एसआयडीमधून गोपनीय माहिती लीक झाली होती. मात्र हे कोणी केली हे शोधता आलं नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

एसआयडी ऑफिसमधील कम्प्युटर हॅक झाल्याने तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही माहिती गेली होती, असा दावा साबीआयने केला आहे.त्यामुळे तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांना क्लिनचीट मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांची चिंता देखील मिटली आहे.
 
या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. गिरीश महाजन, नवनीत राणा, कंगना रानावत, नारायण राणे या सर्वांवर खोटे आरोप लावले होते. त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारने केला होता."

"देवेंद्र फडणवीस यांना देखील जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न झाला होता. त्यावेळी यंत्रणेचा दुरुपयोग झाला होता. ही वस्तूस्थिती आहे. मला देखील काही गोष्टी माहित आहेत. देवेंद्र फडणवीस यांना अडकावयचं आणि जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT