Shivsena Eknath shinde MLA Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गोटातून परतलेल्या आमदारांचे खळबळजनक आरोप; अनेक आमदारांना...

मविआ जिंकणार एवढा आकडा आमच्याकडे; असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.

वैष्णवी कारंजकर

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक आमदार त्यांच्यासोबत सूरत, गुवाहाटीला गेले होते. मात्र शिवसेना खासदार संजय राऊतांनी या आमदारांचं अपहरण झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांना पुष्टी देणारी विधानं आज शिंदे गटातून परतलेल्या दोन शिवसेना आमदारांनी केली आहेत. (Sanjay Raut Eknath Shinde Shivsena MLA Nitin Deshmukh Kailas Patil)

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी परत आलेल्या आमदारांसह पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदारांच्या अपहरणाचा पुनरुच्चार केला. एक गुवाहाटी तर एक सूरतवरुन आले आहेत. आमचा २१ आमदारांशी संपर्क झालेला आहे. कोणी कितीही फोटो, व्हिडीओ पाठवा. विधानसभेत जर काही संघर्ष झाला तर तिथेही महाविकास आघाडी जिंकणार एवढा आकडा आमच्याकडे आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. आग्र्याहून सुटका प्रमाणे हे आमदार परत आलेत, असं संजय राऊत या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. तसंच यांच्या सुटकेची कहाणी थरारक आणि रोमांचक आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे दोन शिवसेना आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातून ठाकरे गटात परतले आहेत. त्यांनीही या पत्रकार परिषदेत दोन दिवसांत काय काय घडलं याबद्दल माहिती दिली. ठाण्याला जायचंय, एकनाथ शिंदेंच्या घरी जायचंय, असं सांगत काहीही कल्पना न देता, गाड्या बदलून आपल्याला गुजरातकडे नेण्यात आलं, असा दावा या आमदारांनी केला आहे. तसंच आपण ट्रकने प्रवास करत, एक किलोमीटर चालत मुंबईत परतलो, असा दावा कैलास पाटलांनी केलाय. आपण मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोललो आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला मदत केली, असंही पाटलांनी सांगितलं आहे.

तर आपल्याला कोणताही हार्ट अटॅक आला नसल्याचा दावा पुन्हा एकदा नितीन देशमुखांनी केला आहे. आपल्याला रुग्णालयात नेलं, तिथं चार पाच जणांनी हातपाय धरले आणि दंडात इंजेक्शन मारलं. तेव्हा मला कळलं की सरकारचा घातपात कऱण्यासाठीचं कारस्थान भाजपाकडून रचलं जातंय. मी डॉक्टरांना मला हातही लावू देत नव्हतो. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गनिमी कावा करत आग्र्याहून सुटका केली, तसंच मी गनिमी कावा करत तिथून निसटलो, अशी कहाणी नितीन देशमुखांनी सांगितली.

अनेक आमदारांना तिथून निसटून यायचं आहे, पण त्यांना ते जमत नाहीये. मी शिंदे साहेबांना आणि सर्व आमदारांना आवाहन करतो की, आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपा कारस्थान रचत आहे हे सरकार अस्थिर करण्याचं. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, इकडे परत या, असं भावनिक आवाहनही देशमुखांनी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT