मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानं आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. उद्धव ठाकरेंना अद्याप यासाठी परवानगी मिळालेली नाही. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाचा दसरा मेळावा घ्यावा, मी देखील या मेळाव्याला येईल असं राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांच्याघरी गणेशाचं आगमन झालं. यानिमित्त सकाळ माध्यम समुहाच्या सरकारनामा या वेब पोर्टलशी बोलताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. (Eknath Shinde should hold Dussehra rally I will also come says Narayan Rane)
राणे म्हणाले, "शिवसेनेत असताना एकनाथ शिंदेंशी आमचं कायम बोलणं व्हायचं. पण आता ते स्वतःच्या कतृत्वावर मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेनेच्या जन्मापासून प्रत्येक वर्षी दसरा मेळावा झालेला आहे. या व्यासपीठावर मी देखील अनेक वेळा भाषणं केली आहेत. पूर्वी दसरा मेळाव्याचा उत्साह वेगळाच असायचा. तिथं विचारांचं सोन वाटलं जायचं ते लुटायला शिवसैनिक तिथं यायचे. पण आता ते विचार राहिलेले नाहीत, उद्धव ठाकरेंचे विचार घेण्याच्या लायकीचे नाहीत. पण एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा जरुर घ्यावा. महाराष्ट्रानं कोणत्या दिशेला जावं यासाठी शिंदेंनी दसरा मेळावा जरुर घ्यावा. मला आमंत्रण दिलं तर मी देखील त्यांच्या मेळाव्याला नक्की जाईन आणि जुना शिवसैनिक कसा असतो याचा नवीन शिवसैनिकाला प्रत्यय घडवून आणीन"
उद्धव ठाकरेंच्या कामाचं विश्लेषण करण्यासारखं काहीही नाही - राणे
उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीचं अॅनेलिसिस करण्यासारखं काहीही नाही. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं नाही की राज्याचा जीडीपी वाढला. ना राज्यात इंडस्ट्री वाढली, ना उत्पादन वाढलं. ना शेतकऱ्यांना न्याय मिळाला, ना मराठी माणसांना नोकऱ्या मिळू शकल्या. काहीच झालेलं नाही. असा निष्क्रीय मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झाला नाही. अडीच वर्षात तीन तास ना मंत्रालयात, ना कॅबिनेटमध्ये, ना सभागृहात मातोश्री सोडून हा मुख्यमंत्री कुठेही गेला नाही. काय बढाया मारतोस गप्प बस ना. बाळासाहेबांना ही शिवसेना घडवायला ४८ वर्षे लागली. या माणसानं अडीच वर्षात शिवसेना संपवून टाकली. या अडीच वर्षात कोणाचाच विकास झाला नाही. शिवसैनिकांनाही काही मिळालं नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.