Deepali Sayyad Uddhav Thackeray Eknath SHinde Balasaheb Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

बाळासाहेबांना गुरुदक्षिणा म्हणून ठाकरे-शिंदेंनी एकत्र यावं - दीपाली सय्यद

दोघांनी एकत्र यावं यासाठीच दीपाली सय्यद आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यायला हवं, अशी अपेक्षा यावेळी दीपाली सय्यद यांनी व्यक्त केलं आहे. दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

भेटीसाठी निघताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, शिवसेनेचे दोन गट एकत्र करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठीच मी शिंदेंना भेटायला चालले आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. शिंदेही बाळासाहेबांना अभिवादन करायला जाणार आहे आणि ठाकरेही. दोघांचे गुरू एकच आहेत. मग या चांगल्या दिवशी काहीतरी चांगली सुरूवात व्हायला हवी अशी माझी इच्छा आहे.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना दोन्ही गटांनी पाठिंबा दिला आहे. हे एकत्र येण्याचे संकेत म्हणता येतील का याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, दौपदी मुर्मू यांना उद्धव साहेबांनी पाठिंबा दिलाय . महिला राष्ट्रपती आहेत , चांगल्या गोष्टींना, चांगल्या व्यक्तींना उद्धव साहेबांनी पाठिंबा दिलाय. ही गोष्टही सारखीच आहे. दोन्ही गटांना एक व्हायला ही गोष्ट आली आहे. ही चांगली गोष्ट आहे.

बाळासाहेबांना गुरुदक्षिणा म्हणून शिंदे आणि ठाकरेंनी एकत्र यावं, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. माझ्यासोबत सर्व शिवसैनिकांची ही अपेक्षा आहे, असंही दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group: अदानी ग्रुपवर गुंतवणूकदारांनी केला मोठा आरोप; सेबीने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिवाळी पार्टीसाठी आली उर्मिला मातोंडकर; पण त्या गोष्टींवर खिळली नेटकऱ्यांची नजर, म्हणाले-

Diwali 2024: दिवाळीत माता लक्ष्मी अन् भगवान गणेशाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवायची? वाचा एका क्लिकवर

Nashik Political News : बाळासाहेब थोरातांशी भेटीनंतर गावितांचा प्रवेशाचा मार्ग सुकर! लवकरच प्रवेश होणार, कामाला लागण्याच्या सूचना

Fraud Calls : अलर्ट! या नंबरवरुन येणारे कॉल आहेत धोक्याचे; क्षणात होऊ शकतो मोबईल हॅक अन् अकाउंट रिकामं

SCROLL FOR NEXT