Eknath Shinde Vs Uddhav Thackery : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरींनी आज अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांची वादळी सभा पार पडली. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या ठाकरी शैलीत तोफ डागली. दुसरीकडे शिंदे यांनी देखील दीर्घकाळ भाषण करत उद्धव यांच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे. आता सोशल मीडियावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी तुलना होताना दिसत आहे. यात कुणाची सरशी झाली, कोणी कुणावर केली कुरघोड़ी असे प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे.
आता आपण उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका आणि त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे पाहणार आहोत. उद्धव ठाकरे म्हणाले...
* माझ्यासमोर सगळे एकनिष्ठ आहेत. काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आतापर्यत दहा तोंडाचा होता आता 50 खोक्यांचा रावण झाला आहे. हा खोकासूर आहे. या गोष्टीचा संताप आहे. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. माझी बोटं हालत नव्हती. त्यावेळी यांच्यावर मी जबाबदारी दिली होती ते आता कट्टापा...हे ते कट करत होते. ते पुन्हा आपल्यासमोर येऊच शकणार नाही. त्यांना कल्पना नाही की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही पंगा घेतला आहे देव तुमचे भले कर
* मी शिवरायांच्या साक्षीनं आणि आई वडिलंच्या शपथ घेऊन सांगतो...अडीच वर्षांचा शपथविधी असं ठरलं होतं. तेव्हा सांगितलं संभव नही. मग आता कसं काय जमलं. माणसाची हाव किती असते...एकनाथ तुला आमदार, मंत्री केला तरी तुला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचंय. आहे का लायकी तुमची, बाप चोरणारी औलाद....माझ्याऐवजी दुसऱ्या वडिलाचं नाव लावतोय....
* बांडगुळाला स्वताची ओळख नसते.....कुणी त्यांना बांडगुळसेना म्हणा असे सांगितले...म्हटलं तसं म्हणता येणार नाही. तो सेना शब्दांचा अपमान आहे....बांडगुळाची मुळं ही झाडावर असतात आणि झाडाची मुळं ही जमिनीत रुतलेली असतात....
* माझ्यासमोरचा माईक अजित दादांनी काढला नाही. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने मान दिला. अनेकांनी त्यांच्याबद्दल सांगितले होते. शरद पवार कोण आहेत हे लक्षात ठेवा असेही काहींनी सांगितले होते.....पाच वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो.....आम्ही सोबत असताना तुम्ही कधी त्या शहरांची नावं बदलली नाहीत....ते आम्ही कॉग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असताना करुन दाखवले..
* अमित शहा म्हणे, शिवसेनेला जमीन दाखवू.... अमित शहा तुम्ही जी पाकव्याप्त काश्मीर मधील त्या जागेवर विजय मिळवून दाखवा. मोदी केवळ बोलतात.....तसे केल्यास आम्ही डोक्यावर घेऊन नाचू.... माझे सैनिक तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतील. तिकडे शेपट्या घालायच्या आणि इकडे पंजे काढायचे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी एकेरीत ठाकरेंचा उल्लेख करुन आपल्या मनातील राग व्यक्त केला आहे. शिंदे म्हणाले...
* बाळासाहेबांचा फोटो आणि दुसऱ्या बाजुला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आम्ही लावला होता. आम्ही केलेली गद्दारी नाही तर हा गदर आहे. ही क्रांती आहे. तुम्ही बापाचे विचार विकले. तुम्ही तर बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. सत्तेसाठी तुम्ही हिंदूत्वाला तिलांजली दिली. बघा काय हा जनसागर आहे. किती यांच्यात उत्साह आहे.
* मराठा समाजाच्या मोर्चाला पण तुम्ही मुका मोर्चा म्हणालात.. पण या राज्यात कुणारवही अन्याय करणार नाही... मी घाबरत नाही.. लोकांसाठी मी काहीही बोगू शकतो... लोकांना न्याय दिल्याशिवाय हे सरकार गप्प बसणार नाही...
* कटप्पा पण स्वाभिमानी होता... तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता.. का त्रास देताय शिवसैनिकांना... आम्ही समोरून वार करणारे आहोत.. पाठीत खंजीर खुपसणारे नाहीत... मागच्या सरकारच्या काळात आमच्यावर मोक्काचे कलम लागले, कार्यकर्ते तडीपार केले गेले पण मी अन्याय होऊ देणार नाही.. असे धंदे आम्ही होऊ देणार नाही..
* अरे माझ्या नातवाचा जन्म झाल्यावर तुमचं अध:पतन सुरू झालं.. कुणावर टीका करावी? कोणत्या पातळीवर जाऊन करायची.. पायाखालची वाळू सरकली ना.... तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती.. बाळासाहेबांचे विचार तोडून तुम्ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली... आता जर बाळासाहेब असते तरत्यांनी काय केलं असतं...
* हा एकनाथ संभाजी शिंदे आहे... तुम्ही म्हणताय बापाचं नाव लावता... माझ्या बापाने मोठा त्याग केलाय.. माझ्या बायकोने सुद्धा त्याग केलाय तिने भोगलंय सोसलंय आणि तुम्ही त्याची टिंगल करताय? तुम्ही म्हणता माझ्या वडिलांचं नाव घेतो म्हणतात पण आम्ही त्यांचा विचार पुढे नेतोय....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.