Ajit Pawar Latest Update : अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यापासून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावक रंगली आहे. मात्र, भाजपच्या गोटातून या चर्चांना फेटाळलं आहे.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर न करण्याची काही कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला केल्यास भाजपची विश्वासर्हता धोक्यात येऊ शकते. भाजपने शिंदे गटाला डच्चू दिल्यास आगामी काळात कोणताही प्रादेशिक पक्ष भाजपसोबत येताना नक्की विचार करेल, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.
तर विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र केलं जाण्याची शक्यताही फारच कमी असल्याचंही भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. (Marathi Tajya Batmya)
दुसरं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये आता सहभागी झाली असली तरी सरकार स्थापनेत त्यांचं कोणतंही योगदान नाही. तर मोठं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीशिवाय खातेवाटप अंतिम होऊ शकत नाही.
तिसरं कारण म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणूका. नड्डा यांनी दिलेला मुंबई 150 हा आमचा नारा कायम आहे. मुंबई जिंकणार आणि चांगल्या पद्धतीने जिंकणार महापालिका निवडणुका आम्ही शिवसेनेच्या सोबत लढणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. (Marathi Tajya Batmya)
पुढचं कारण आगामी लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीकोनातून भाजप शिंदे गटाला डच्चू देऊ शकत नाही. तर आगामी निवडणुकीत जास्त जागा जिंकण्याचे लक्ष भाजपने ठरवले आहे.
राज्यातील विरोध करणारे पक्ष आपल्या बाजूने वळवण्यासाठीचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत, यामुळे शिंदे गटाला भाजप सोडू शकत नाही असा अंदाज काही राजकीय नेते वर्तवत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.