Uddhav Thackeray-Ajit Pawar-Devendra Fadnavis google
महाराष्ट्र बातम्या

डिसेंबर ते मार्चपर्यंत निवडणुकीची रणधुमाळी? पहिल्यांदा महापालिका, पुन्हा झेडपी निवडणूक

पहिल्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती व ग्रामपंचयतींची निवडणूक घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या ८४ दिवसांत (दोन टप्पे) निवडणूक उरकल्या जातील, असेही सांगण्यात आले.

तात्या लांडगे

सोलापूर : दिवाळी सुटीनंतर नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सुरवात होऊ शकते. पहिल्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांची आणि दुसऱ्या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती व ग्रामपंचयतींची निवडणूक घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत ८४ दिवसांत (दोन टप्पे) निवडणूक उरकल्या जातील, असेही सांगण्यात आले.

राज्यातील २५ जिल्हा परिषदा, १८ महापालिका, दोन हजार १६४ नगरपरिषदा व नगरपालिका आणि २८४ पंचायत समित्यांची मुदत सहा महिन्यांपूर्वीच संपली आहे. आता डिसेंबरअखेरीस राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील आठ ते साडेनऊ हजार ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. लोकहितासाठी काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फारकाळ प्रशासक असू नये, असे मानले जाते. मार्चपासून महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिकांवरील मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. आता ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर त्याठिकाणी ग्रामसेवक प्रशासक म्हणून काम पाहतील. सर्वच अधिकारी प्रशासक म्हणून काम करत असतील तर उर्वरित कामे कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ऑक्टोबरअखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये निश्चितपणे निवडणुकांची रणधुमाळी सुरु होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

प्रभाग रचना, गट, गणातील बदल रद्द? २०११ऐवजी सध्याची लोकसंख्या गृहित धरून जिल्हा परिषद व पंचायत समितींची गण, गट रचनेत बदल करण्यात आला. त्यावेळी अनेक गट, गणाची रचना बदलली आणि सदस्य देखील वाढले. दुसरीकडे महापालिकेची प्रभाग रचना चारऐवजी तीन करण्यात आली. पण, महाविकास आघाडीने स्वत:च्या सोयीसाठी केलेला हा बदल रद्द करण्याची भूमिका शिंदे सरकारने घेतली आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा विषय अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. हा तिढा न्यायालयात सुरु असून काही दिवसांत त्यावर निकाल अपेक्षित आहे. नोव्हेंबरपासून निवडणुकांचा बिगुल वाजेल, असा अंदाज उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी व्यक्त केला.

मुदत संपलेल्या महापालिका

मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर.

२५ जिल्हा परिषदांची मुदत संपली

अमरावती, चंद्रपूर, सातारा, जालना, रत्नागिरी, बीड, कोल्हापूर, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, नांदेड, बुलडाणा, औरंगाबाद, वर्धा, लातूर, नाशिक, जळगाव, सोलापूर, नगर, यवतमाळ, रायगड, गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा: हर्षित माहीमकरला दुहेरी मुकुटाची संधी, १७ वर्षांखालील मुले व पुरुष विभागाच्या अंतिम फेरीत

राज्यात महायुती सत्तेवर येताच संरक्षणासाठी 'यूपी'चे सूत्र लागू होणार; कोल्हापुरात योगी आदित्यनाथ यांची घोषणा

Narendra Modi : नायजेरियाबरोबरील भागीदारी महत्त्वाची मोदींचे प्रतिपादन; तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

SCROLL FOR NEXT