नवी दिल्लीः महाराष्ट्रातल्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसह देशाताल त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयात आज मतमोजणी होत असून निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत.
या तिनही राज्यांमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. तर मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान झालं.
मेघालयामध्ये भाजप, काँग्रेस, एनपीपी आणि तृणमूल काँग्रेससह १३ राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. एकूण ३७५ उमेदवार नशिब आजमावत आहेत. यामध्ये ३६ महिला उमेदवार आहेत. भाजप आणि काँग्रेसने या निवडणुकीत ६०-६० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. तर तृणमूल काँग्रेसने ५६ उमेदवारांना तिकीट दिलंय.
याशिवाय सीएम कोनराड के. संगमा यांच्या नेतृत्वातील एनपीपीने ५७ उमेदवार, यूडीपीपेने ४६ उमेदवार, एचएसपीडीपीने ११, पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंटने ९, गण सुरक्षा पार्टीने १, गारो नॅशनल पक्षाने दोन, जनता दल (युनायटेड)ने तीन उमेदवार उभे केले आहेत.
नागालँडमध्ये भाजपसोबत युतीमध्ये असलेला एनडीपीपी आघाडीवर आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत ५८ जागांच्या कलांमध्ये ३६ जागांवर एनडीपीपी आघाडीवर आहे. तर ७ जागांवर एनपीएफ आणि २ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.
त्रिपुरामधून सध्या आलेल्या कलांनुसार भाजप ४० जागांवर आघाडीवर आहे. ५ जागांवर डावे तर ५ जागांवर टीएमपी पुढे आहे. मागच्यावेळी भाजपने ३५ जागांवर विजय मिळवला होता.
तिकडे नागालँडमध्ये ५९ पैकी ३३ जागांवर एनडीपीपी आघाडीवर आहे. तर एनपीएफ २ जागांवर, काँग्रेस १ आणि इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.