electric vehicle  
महाराष्ट्र बातम्या

Electricity Usage by EVs : राज्यात इलेक्ट्रिक वाहने सुसाट! दहा महिन्यांत तिप्पट वाढला वीजेचा वापर

रोहित कणसे

राज्यासह देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लोकांचा ईव्ही खरेदीकडे कल वाढलेला असतानाच वीजेच्या वापराबद्दल देखील महत्वाची माह्िती समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड(MSEDCL)ने सोमवारी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVs) विजेचा वापर गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये 4.56 दशलक्ष युनिट्सवरून जुलै 2023 पर्यंत 14.44 दशलक्ष युनिट्स इतका वाढून तिप्पट झाला आहे.

राज्य सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या महावितरणकडून ईव्हीसाठी चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देणे. तसेच खाजगी क्षेत्राला अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत करण्यात येईल, अशी माहिती देखील अधिकृत प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. तसेच महावितरण या क्षेत्रात काम करणारी एक नोडल एजन्सी असून ही सरकारला यासंबंधीत धोरणांमध्ये मदत करण्यासारखी इतर कामे देखील करते.

महाराष्ट्रात इलेक्टीक वाहनांचा वीज वापर सप्टेंबर 2022 मध्ये 4.56 दशलक्ष युनिट्स होता, मार्चमध्ये तो 6.10 दशलक्ष युनिट आणि या वर्षी जुलैमध्ये 14.44 दशलक्ष युनिट्सपर्यंत वाढला, अशी माहिती महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

इतकेच नाही तर राज्यभरातील 3,214 सार्वजनिक आणि खाजगी चार्जिंग स्टेशन्सवरून ईव्हीसाठी वीज विक्री झाली, तसेच महाराष्ट्रात ईव्हीची विक्री 2018 मध्ये 4,643 युनिट्सवरून 2022 मध्ये 1,89,698 युनिट्सपर्यंत आणि 31 मार्चपर्यंत 2,98,838 युनिट्सपर्यंत वाढली असल्याची माहिती देखील यामध्ये देण्यात आली आहेय. महावितरणच्या पत्रकात ईव्हीमध्ये दुचाकींची संख्या अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याचेही सांगण्यात आले आहे.

तसेच यामध्ये 2018 मध्ये फक्त चार इलेक्ट्रिक बसेस विकल्या गेल्या, 2022 मध्ये 336 आणि ही संख्या मार्च 2023 अखेर 1,399 पर्यंत वाढली. त्यात असेही म्हटले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांच्याकडे एकनाथ शिंदे सरकारमध्ये ऊर्जा खाते देखील आहे, त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ईव्हीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहिती देखील या पत्रकात देण्यात आली आहे.

पारंपारिक इंधन पेट्रोलवर चालणार्‍या दुचाकीचा ऑपरेटिंग खर्च 2.12 रुपये प्रति किलोमीटर आहे, तर इलेक्ट्रिक दुचाकीसाठी 54 पैसे प्रति किलोमीटर इतका खर्च येतो. पेट्रोलवर चालणार्‍या चारचाकीचा ऑपरेटिंग खर्च 7.57 रुपये प्रति किलोमीटर आहे. जे इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांच्या बाबतीत फक्त 1.51 रुपये प्रति किलोमीटर आहे, अशी माहितीदेखील महावितरणकडून जारी करण्यात आलेल्या रिलीझमध्ये देण्यात आली आहे.

पारंपारिक तीन-चाकी वाहनाचा ऑपरेटिंग खर्च 3.20 रुपये प्रति किलोमीटर आहे, तर इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरसाठी तो 59 पैसे प्रति किलोमीटरवर खाली येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

Latest Marathi News Updates : RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

Sharad Pawar: श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ घेणार शरद पवारांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले अन्...! R Ashwin शतकी खेळीनंतर काय म्हणाला ते वाचा

SCROLL FOR NEXT