मुंबई- सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त केली आहे. खडसेंची लोणावळा आणि जळगावमधील संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यातील भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 5 कोटी असल्याचं सांगण्यात येतंय. एएनआयने ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Maharashtra Latest News)
भोसरी जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करत आहे. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली होती. गिरीश चौधरी असे त्यांचे नाव आहे. ईडीने फेमा, 1999 च्या तरतुदींनुसार पीसी फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (NBFC) च्या पेमेंट गेटवेसह बँक खाती आणि व्हर्च्युअल खात्यांमध्ये असलेले 106.93 कोटी रुपये जप्त केले होती.
2016 मध्ये एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीचा बाजारभाव 31 कोटी होता, पण गिरीश यांनी ही मालमत्ता तीन कोटींना विकत घेतली. ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची होती. एकनाथ खडसे हे त्यावेळी महसूलमंत्री होते. अगदी कमी किंमतीत गिरीश यांना ही जमीन देण्यात आली. गिरीश यांच्याकडे असलेल्या तीन कोटी रुपयांचा नेमका स्रोत काय, याचा तपास ईडी करत आहे.
काही दिवसांपूर्वी झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याची बातमी आली होती. मंत्रालयातून हा गोपनीय अहवाल गायब झाल्याने एकच खळबळ उडाली. या अहवालात खडसे यांनी पदाचा गैरवापर केल्याचं म्हणण्यात आलं होतं. दरम्यान, झोटिंग समितीचा अहवाल सापडला असल्याची माहिती नंतर देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.