smile sakal
महाराष्ट्र बातम्या

मंत्रिमंडळ विस्तारावर सोशल मीडियावर मिम्सचे मनोरंजन! तुम्‍हाला हसू येईल, अशा कमेंट जरूर वाचा

शिंदे-फडणवीस सरकारला ३० जून रोजी एक वर्षे पूर्ण झाले. त्याच्या दोन दिवसांनी (रविवारी) राष्ट्रवादीच्या ३५ ते ३६ आमदारांचा गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामिल झाला. त्यानंतर अक्षरश: सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ पहायला मिळाला.

तात्या लांडगे

सोलापूर : महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला ३० जून रोजी एक वर्षे पूर्ण झाले. त्याच्या दोन दिवसांनी (रविवारी) राष्ट्रवादीच्या ३५ ते ३६ आमदारांचा गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामिल झाला. त्यानंतर अक्षरश: सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ पहायला मिळाला. त्यातून अनेकांचे मनोरंजन झाले तर काहींनी धडा देखील घेतला

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मिडियावर आपापल्या प्रतिक्रिया दिलखुलास नोंदवल्या. त्यातून अनेकांचे दिवसभर मनोरंजन झाले. विशेष बाब म्हणजे अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्यातील सर्वच पक्ष सत्तेत येऊन गेल्याचे स्पष्ट झाले. विशेष बाब म्हणजे वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात लढलेल्या सर्वच पक्षांनी एकमेकांशी सलगी केल्याचेही पहायला मिळाले.

अजित पवार राष्ट्रवादी फोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याबद्दल अनेकांनी समर्थन केले तर काहींनी विरोध देखील केला. काहींनी यामागे देवेंद्र फडणवीस यांची रणनिती असल्याचेही म्हटले आहे. सोशल मिडियावर मीम्समध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, निवडणूक आयोग व तत्कालीन राज्यपाल व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर आधारित प्रतिक्रिया होत्या. शेवटी नागरिक मुर्ख नाहीत इतकच, सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, जनताच आता विरोधीपक्ष होणार, असाही संदेश सोशल मिडियातून अनेकांनी दिला.

सोशल मीडियावरील मिम्स वाचा...

  • - निवडणूक आयोगाने आता आमच्या बोटाला शाई लावण्याऐवजी चुना लावावा.

  • - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंबद्दल, ‘कोणाविरूद्ध उपोषण करावं, तेच कळत नाहीये’.

  • - राज्याचे उपमुख्यमंत्री कोण विचारल्यावर शाळेतील मुलगा म्हणतोय, ‘५ वर्षाच्या शेवटी सांगतो’.

  • - तत्कालीन राज्यपाल म्हणतात, ‘आता माझं नाव घेतलं तर दगडच मारीन’.

  • - कोणी म्हणतयं, मतदान कार्ड विकणे आहे.

  • - लोकांच्या कल्याणासाठी हिवाळा, पावसाळा, उन्हाळा एकत्र.

  • - काका म्हणाले, ‘आता आपले किती आमदार राहिले मोजून घ्या’.

  • - वैतागलेला पुणेकर ‘अजितदादा प्रत्येकवेळी आम्ही झोपेत असतानाच का शपथ घेतात’.

  • - पवार साहेबांनी भाकरी फिरवली, दादांनी पिटाचा डबाच गायब केला.

  • - काका भाकरी फिरवणार होते, पुतण्याने तवा पळवून चुलीत पाणी टाकून ती विझवली.

  • - मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ‘सासुमुळे वाटणी केली आणि सासुच वाट्याला आली’.

  • - ५० खोके एकदम ओके म्हणणारे तेच लोक आता अजितदादांसोबत आपल्याकडे आलेत, त्यांना कायम म्हणायचं.

  • - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या कनात सांगत आहेत, ‘आम्ही राष्ट्रवादीला कंटाळून बाहेर पडलो म्हणून सांगितले, आता लोकांना आमदारांना काय सांगू’.

  • - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (खुर्द) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (बुद्रुक).

  • - एकदाच मतदान केले, तरीपण चार वर्षांत‌ अजितदादा तिनवेळा उपमुख्यमंत्री झाले.

  • - राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात, शिंदे गटाला म्हणजे सुरत, गुवाहाटीला नेऊन काय हाटील, काय डोंगर काय झाडी एकदम ओके केले, आम्हाला थेट राजभवनात.

  • - केसीआर म्हणतात, महाराष्ट्रात तर लय डेंजर हाय, उगाच ६०० गाड्यांमध्ये पेट्रोल भरून पंढरपूरला गेलो.

  • - खासदार किरीट सोमय्या म्हणतात, हे कागदाचे बंडल आता नदीत सोडून येतो, काय कामाचे नाहीत राहिले आता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT