mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

उद्योजक यायला तयार, पण जागा मिळेना! सोलापूर, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील 176 बंद उद्योगांना नोटीस; 8000 एकराच्या भूसंपादनाचा निर्णय प्रलंबितच

पुणे-मुंबईसह सोलापूरमधील 33 उद्योजकांनी उद्योग सुरू करण्यासाठी सोलापूरमधील एमआयडीसींमध्ये जागेची मागणी केली. परंतु, अजून त्यांना जागा मिळाली नाही. नवीन जमिनींच्या भूसंपादनाचा विषय प्रलंबित असून दुसरीकडे अनेकांनी नुसत्या जागा घेऊन ठेवल्या पण उद्योग सुरू केलेले नाहीत.

तात्या लांडगे

सोलापूर : पुणे-मुंबईसह सोलापूरमधील ३३ उद्योजकांनी उद्योग सुरू करण्यासाठी सोलापूरमधील एमआयडीसींमध्ये जागेची मागणी केली आहे. परंतु, अजूनही त्यांना जागा मिळालेली नाही. नवीन जमिनींच्या भूसंपादनाचा विषय प्रलंबित असून दुसरीकडे अनेकांनी नुसत्या जागा घेऊन ठेवल्या पण उद्योग सुरू केलेले नाहीत, अशीही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दीडशेहून अधिक उद्योजकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

राज्यातील अनेक मोठमोठे उद्योग परराज्यात गेले असून अजूनही अनेकजण त्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. उद्योजकांसाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा असलेल्या ठिकाणी त्यांना पुरेशा प्रमाणात जमीन मिळत नाही, याशिवाय टॅक्स व अन्य अडचणी त्यासाठी कारणीभूत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक तरुणांना जिल्ह्यातील विविध एमआयडीसींमध्ये नोकरी तथा रोजगार मिळेल, अशी स्थिती आहे. पण, त्यासाठी चिंचोळी (ता. मोहोळ), कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर), मोडनिंब (ता. माढा), कासेगाव (ता. पंढरपूर), गौडगाव टप्पा दोन (ता. बार्शी) व गारवाड (ता. माळशिरस) येथील एमआयडीसींमध्ये आठ हजार एकर (३२०० हेक्टर) जमीन आवश्यक आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागाला त्यासंबंधीचे प्रस्ताव गेले आहेत, पण अजूनही त्या जमिनीचे संपादन सुरू झालेले नाही. आगामी काळात त्यावर निर्णय न झाल्यास हे उद्योजक दुसरीकडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

१७६ बंद उद्योजकांना नोटीस

ज्या उद्योजकांनी एमआयडीसींमध्ये उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने जागा घेतल्या, पण अनेक वर्षे होऊनही उद्योग सुरू केले नाहीत किंवा बंद उद्योग पुन्हा सुरूच केले नाहीत. अशा छोटे उद्योग (३ महिने) ते मध्यम उद्योग (६ महिने) व मोठ्या उद्योगांना (९ महिने) ती जागा दुसऱ्याला पोटभाड्याने द्यावी, दुसऱ्या उद्योजकांना हस्तांतर करावी, अशा नोटीसा बजावल्या आहेत. त्यानुसार चिंचोळी एमआयडीसीतील १३८ तर अक्कलकोट रोड एमआयडीसीतील ३८ उद्योजकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील एमआयडीसींची सद्य:स्थिती

  • एमआयडीसी भूसंपादनाचा प्रस्ताव

  • चिंचोळी १५१.३२ हेक्टर

  • कुंभारी ९४६ हेक्टर

  • मोडनिंब ३७.६६ हेक्टर

  • कासेगाव २१.१५ हेक्टर

  • गौडगाव ८२.७० हेक्टर

  • गारवाड १७५४.५२ हेक्टर

  • एकूण ३१९३.७१ हेक्टर

३३ उद्योजकांना हवीय ११५ एकर जमीन

सोलापूर जिल्ह्यातील चिंचोळी, मंगळवेढा, बार्शी, टेंभुर्णी, करमाळा या एमआयडीसीत ३३ उद्योजकांनी जागा मागितली आहे. या एमआयडीसीतील नव्या उद्योजकांसाठी व सध्याच्या काही उद्योजकांना त्यांचा उद्योगाचा विस्तार वाढविण्यासाठी जमिनी हव्या आहेत. पण, त्यावर भूखंड वाटप समितीकडून निर्णय झालेला नाही. चिंचोळी एमआयडीसीसाठी आणखी १५१.३२ हेक्टर जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव एमआयडीसीच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु, त्यावर अनेक महिन्यांपासून निर्णय झालेला नाही. दुसरीकडे होटगी रोडवरील लॉजिस्टिक पार्कचा विषयही प्रलंबितच आहे.

सत्ताधारी ११ आमदार, तरीही सरकार दरबारी उपेक्षाच

जिल्ह्यातील ‘शहर मध्य’ हा एकमेव विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित दहा मतदारसंघासह एक विधान परिषदेचे असे एकूण ११ आमदार सत्ताधारी पक्षाचेच आहेत. विद्यमान आमदारांमध्येच दोन माजी मंत्रीही आहेत. सोलापूर शहर-जिल्ह्यातून रोजगार तथा उदरनिर्वाहासाठी सुशिक्षित तरुणांसह अनेकजण स्थलांतर करत आहेत. सोलापुरात उद्योजक यायला तयार आहेत, पण एमआयडीसींमध्ये पुरेशी जागा मिळत नाही, अशीही वस्तुस्थिती आहे. त्यावर लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडतोय असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT