शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोग आणि सरकारवर आरोप केले आहेत. आता महाराष्ट्र निवडणूक आयोग या विषयावर पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले की, आज आलेल्या बातम्यांबाबत काही लोकांनी ट्विट केले आहे. पण सत्य हे आहे की ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नसते. ईव्हीएम मशीन इतर कोणत्याही डिव्हाईसशी जोडता येत नाही. वर्तमानपत्रांमध्ये आजा चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की, ईव्हीएम ही स्वतंत्र प्रणाली आहे. याबाबत येत असलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, आम्ही अशा बातम्या छापणाऱ्या वृत्तपत्रांना नोटीसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर मानहानीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी, यांनी एका वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीवर उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती.
वृत्तपत्रात दावा करण्यात आला आहे की, "शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना त्यांच्या नातेवाईकांनी मोबाईलचा वापर करून 48 मतांच्या फरकाने विजय मिळवून दिला आहे. ४ जून रोजी मतमोजणीच्या वेळी हा फोन ईव्हीएमशी कनेक्ट होता."
वायकर यांचे मेहुणे मंगेश पांडिलकर यांच्यावर बुधवारी 4 जून रोजी, मतमोजणी केंद्रावर मोबाईल फोन वापरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी दिली.
वनराई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, वायकर यांच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात पांडलीकर यांनी केलेल्या कथित कृत्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.