लासलगाव : कांद्या पाठोपाठ बिगर बासमती तांदूळ निर्यातीवरील बंदी शिथिल केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व व्यापार विभागाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी तत्काळ उठवली आहे, अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क देखील कमी करत २० टक्क्यांवरून दहा टक्क्यावर आणले आहे. सरकारने या आधी २०२३ मध्ये तांदळाच्या देशातील दर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदी केली होती.
परंतु आता बंदी हटवण्यात आल्यामुळे देशभरातील तांदूळ निर्यातदारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.तसेच आता सर्वसामान्य निर्यातदार बिगर बासमती तांदळाची निर्यात करू शकणार आहे. देशात सर्वांत जास्त तांदूळ पिकविणारे राज्य हरियाना आहे. हरियानामध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने सदर निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने बासमती तांदळावरील निर्यात मूल्य ९५० डॉलरने कमी केले आहे. भारताने वर्षभरात ४८ हजार ३८९ कोटींचा व्यवसाय केला असून बासमती तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून भारताने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. भारतातून बासमतीची विक्रमी निर्यात झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ २५ टक्क्यांनी जास्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.