मुंबई : तुम्ही नोकरी, धंद्यात अपयशी ठरत आहात का, आर्थिक समस्या आहे का, सुखी संसारात विघ्न येत आहेत का, प्रेमात धोका मिळाला का, असे प्रश्न उपस्थिती करीत तुमचे सगळे प्रश्न खात्रीने सोडविणार असं सांगणाऱ्या भोंदू बाबांची जाहिराती मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांध्ये झळकतात. यांदर्भात अनेक तक्रारी सुद्धा रेल्वेला प्राप्त झाल्या. त्यामुळे आता आरपीएफने या भोंदू बाबांच्या जाहिरातीवर आळा घालण्यासाठी विशेष चौकशी पथकांची नेमणूक केली आहे.
बेकायदेशीर जाहिराती लोकलमध्ये लावणे हा एक प्रकारच्या गुन्हा आहे. यावर प्रतिबंध असून सुद्धा रेल्वे प्रशासन यावर पूर्णपणे प्रतिबंध लावू शकले नाही. या बाबांविरोधात रेल्वेने कठोर कारवाई सुद्धा करित असते. परंतु तरीसुद्धा बाबांकडून लोकलच्या डब्यात जाहिराती झळकत आहे. त्यामुळे अनेकांची अर्थिक फसवणूक होत असून गाडीचेही विद्रुपीकरण होत आहे. मात्र त्याकडे रेल्वेने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
यांसंदर्भात आता प्रवाशांच्या सुद्धा तक्रारी रेल्वेला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी जाहिरातीवर कारवाई करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमणार असल्याची माहिती दिली आहे.
जाहिराती लोकल किंवा रेल्वे एक्स्प्रेसवर चिकटविल्या जात असल्याने गाडीचेही विद्रुपीकरण होत आहे. या जाहिराती लोकलमधून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाला कर्मचारी कामाला लावावे लागतात. जेव्हा-जेव्हा अशा जाहिराती रेल्वेच्या निदर्शनात आल्या आहे. तेव्हा त्या जाहिरातीवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून त्यांना रेल्वेकडून नोटीस देण्यात आली आहे. तसेच भोंदूबाबाच्या जाहिरातविरोधात कारवाई पण करण्यात आली आहे. परंतु हे प्रकार थांबलेले नाही. त्यामुळे आता आरपीएफ पोलिसांकडून विशेष चौकशी पथक नेमण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.