rc book sakal
महाराष्ट्र बातम्या

वा रे पठ्ठ्या! एजटांनी केल्या ‘RTO’ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या; RC बूकसाठी त्यांच्याकडेच पाठवले अर्ज

खासगी वाहनांवरील बॅंकांचा बोजा उतरविणे व आरसी बूक मिळविण्यासाठी शासकीय अर्जावर सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे व विजय तिराणकर यांच्या बनावट सह्या केल्या. या प्रकरणी तिराणकर यांनी ११ जणांविरूद्ध विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : वाहन मालक व वाहन मालक प्रतिनिधींनी (एजंट) संगनमत करून खासगी वाहनांवरील बॅंकांचा कर्जाचा बोजा उतरविणे व दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बूक) मिळविण्यासाठी शासकीय अर्जावर सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे व विजय तिराणकर यांच्या बनावट सह्या केल्या. या प्रकरणी तिराणकर यांनी ११ जणांविरूद्ध विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे.

आरटीओ कार्यालयाजवळ बसून वाहन मालकांची कामे करणाऱ्या एजटांनी चक्क आरटीओ अधिकाऱ्यांच्याच बनावट स्वाक्षऱ्या केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. तिराणकर यांच्या फिर्यादीवरून मुस्कान नदीम शेख, परमेश्वर मरगू गाडीवडार, जाविद मन्सुर पठाण, मकवाना संजय बाबुलाल, योगेश्वर सुरेश दळवे, रफिक अल्लाद्दीन फुलारी, इरण्णा भुताळी गायकवाड, भंडारी शिलेषबाबा साहेबलाल, रियाज बेलिफ, रिझवान व अय्याज यांच्याविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तत्पूर्वी, आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यासंबंधीची सखोल चौकशी केली. त्यात ११ जणांनी २३ जून ते ४ जुलै २०२३ या काळात अशा प्रकारचे गंभीर कृत्य केल्याची बाब समोर आली. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. संशयित सध्या पसार झाले असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा शोध सुरु आहे.

बनावट सह्यांचे अर्ज पडताळणीसाठी त्याच अधिकाऱ्यांकडे

अकरा जणांनी खासगी वाहनांवरील बॅंकांचा बोजा उतरवून दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच बनावट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळविण्यासाठी आरटीओ कार्यालयातून अर्ज घेतले. त्यावर सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या. अंतिम मान्यतेसाठी ते अर्ज त्याच अधिकाऱ्यांकडे पाठविले. त्यावेळी फिर्यादी विजय तिराणकर यांच्या नजरेत ही बाब पडली. आपण तर त्या अर्जांवर कोणतीही स्वाक्षरी केली नाही, तर या अर्जांवर सह्या केल्या कोणी, याची पडताळणी त्यांनी स्वत: केली. त्यावेळी ११ लोकांनी केलेली बनावटगिरी समोर आली आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

वाहन मालकाच्याही बनावट सह्या

‘फायनान्स’कडील वाहनांवरील बॅंकांचा बोजा उतरवून बनावट आरसी बूक मिळावा म्हणून अर्ज करताना त्या मालकाने समोर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यावेळी त्याचे आधारकार्ड पाहून अधिकाऱ्यांसमोरच स्वाक्षरी व थंब घेतले जाते. पण, या प्रकरणात संशयितांनी एकाही वाहन मालकाला अधिकाऱ्यांसमोर न आणता त्यांच्याही स्वाक्षऱ्या बनावट केल्या आणि अधिकाऱ्यांच्याही सह्या बनावटच. हा प्रकार गंभीर असल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करून थेट पोलिसांत फिर्याद दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT