Rain Kharif Season Farmer esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Season : पावसाचा अद्याप पत्ताच नाही; 'पेरणी'बाबत कृषी विभागानं दिली महत्वाची अपडेट

हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे यंदा खरिपातील पिके चांगली येतील, हा अंदाज लावून शेतकरीही आनंदात होता.

हेमंत पवार

यंदा मात्र जूनच्या मध्यावरही पावसाचा पत्ताच नाही. आकाशात ढग येत आहेत. मात्र, पाऊसच पडत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

कऱ्हाड : हवामान खात्याने (Meteorology Department) यंदा चांगला पाऊस (Rain) होईल, असा अंदाज दिल्याने शेतकरी खरीप हंगामात (Kharif Season) चांगले पीक येईल, या आशेने आनंदात होता. मात्र, जून महिना निम्मा होऊनही अद्याप पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

दर वर्षी मॉन्सूनच्या पावसापूर्वी होणाऱ्या वळिवाच्या पावसावर आतापर्यंत सुमारे २५ ते ३० टक्के पेरण्या पूर्ण होतात. यंदा मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकरी (Farmer) आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे कृषी विभागाने (Agriculture Department) आवाहन केले आहे.

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सातारा जिल्हा हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात दर वर्षी सोयाबीन, बाजरी, भात, भुईमूग, मका, ज्वारी, मूग, नाचणी, तूर, उडीद, इतर कडधान्य आणि उसासह अन्य पालेभाज्या, भाजीपाल्याची पिके खरिपात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्याद्वारे शेतकऱ्यांना चार पैसेही मिळतात. त्यामुळे शेतकरी ही पिके दर वर्षी घेतात.

हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे यंदा खरिपातील पिके चांगली येतील, हा अंदाज लावून शेतकरीही आनंदात होता. दर वर्षी पावसाळ्यापूर्वी वळिवाचे दमदार आगमन होते. त्यावर शेतकरी पेरणीपूर्व मशागती उरकून घेत अधूनमधून पडणाऱ्या वळिवाच्या पावसावर जमिनीतील ओल बघून पेरण्याही करून घेतात. त्यातून दर वर्षी १५ जूनपर्यंत सुमारे २५ ते ३० टक्के पेरण्या उरकलेल्या जातात.

यंदा मात्र जूनच्या मध्यावरही पावसाचा पत्ताच नाही. आकाशात ढग येत आहेत. मात्र, पाऊसच पडत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अजूनही काही दिवस पाऊस न आल्यास पेरण्या लांबून रब्बीतील पिकांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पेरणीसाठी शेतजमिनी शेतकऱ्यांनी तयार केल्या आहेत. मात्र, पाऊसच नसल्याने शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

डोंगराळ भागात धूळवाफेवर पेरण्या

सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागातील शेतकरी त्यांच्या अंदाजानुसार धूळवाफेवर पेरण्या करतात. त्यात महाबळेश्वर, जावळी, कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील डोंगराळ भागातील काही गावांचा समावेश आहे. यंदाही काही प्रमाणात तेथील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरण्या केल्या आहेत. मात्र, पावसाचा पत्ताच नसल्याने त्यांचेही धाबे दणाणले आहेत.

खरिपातील पेरणीची प्रस्तावित आकडेवारी

पीक पेरणीचे क्षेत्र

  • सोयाबीन ८८ हजार ८०० हेक्टर

  • बाजरी ६० हजार ७०० हेक्टर

  • भात ४७ हजार ७३९ हेक्टर

  • भुईमूग ३१ हजार ७०० हेक्टर

  • मका २१ हजार २०० हेक्टर

  • ज्वारी १२ हजार हेक्टर

  • मूग १२ हजार हेक्टर

  • नाचणी पाच हजार ६०० हेक्टर

  • तूर एक हजार हेक्टर

  • उडीद पाच हजार हेक्टर

  • इतर कडधान्य ४४ हजार ६०० हेक्टर

  • ऊस एक लाख ७ हजार हेक्टर

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय खरीप हंगामातील पिकांची पेरणी करू नये. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये. थोडी प्रतीक्षा करून पावसानंतरच पेरणी करावी.

- भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT