youth marriage problem rural areas story marathi Village girls prefer city boys sakal
महाराष्ट्र बातम्या

शेतकरी नवरा नको गं बाई! गाव-खेड्यातील मुलींची शहरातील मुलांना पसंती

गावातील मुलांची लग्‍न कशी होणार? असा प्रश्‍न उपवरासह त्‍याच्या आई-वडिलांना पडला आहे.

वसंत जाधव

आयुष्याचा जोडीदार हा मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातला असावा, असे अनेक मुलींना वाटते; परंतु कोरोनाच्या काळात या पसंतीत बदल होत असल्‍याचे पाहायला मिळाले, आता पुन्हा कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील मुली मुंबई, पुण्यात राहणारा मुलगा लग्नासाठी हवा असा अट्टाहास करू लागल्या आहेत.

त्यामुळे गावातील मुलांची लग्‍न कशी होणार? असा प्रश्‍न उपवरासह त्‍याच्या आई-वडिलांना पडला आहे. मुलींना शेती हवी, जमीन हवी, मात्र शेतकरी नवरा नको झाल्‍याने वावरातील कारभाऱ्याला आता कारभारीण मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नवीनच सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.

गाव-खेड्यातील मुलींची शहरातील मुलांना पसंती

सध्या लगीनसराईचा हंगाम सुरू आहे. मार्च ते मे महिन्यापर्यंत विवाह जुळण्याचा व ऊरकण्याचा कालावधी मानला जातो. आजच्या वैज्ञानिक युगामध्ये शिक्षणाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. शिकल्या सवरलेल्या मुली व त्यांचे पालक आपल्या मुलींसाठी शिकलेला व सरकारी नोकरी किंवा चांगला पगार, घरी थोडीफार शेती असलेल्या मुलालाच पसंती देत आहेत.

खासगी नोकरी आणि कमी पगार असला तरी चालेल, पण शहरात राहणारा असावा, अशी अपेक्षा खेडे-गावातील मुलींकडून होत आहे. जुन्या काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार तर नोकरी कनिष्ठ समजली जायची. मात्र आधुनिक काळामध्ये चित्र बदलले आहे.

आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, आणि शेतीला कनिष्‍ठ दर्जा दिला जात आहे. पूर्वी शेतीला मोठी प्रतिष्ठा प्राप्त होती. परंतु बदलत्या काळामध्ये शेती व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.

शेतकऱ्याच्या मुलीने आपल्या वडिलांचे काबाडकष्ट व शेतीमुळे कुटुंबाची होत असलेली वाताहत डोळ्यांनी बघितलेली असते. त्यामुळेच सध्या तिला शेतकरी नवरा नको आहे. दाण्यापासून हजार दाणे करणाऱ्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. या अन्नदात्‍याचा कुठल्याही बाबीचा राज्यकर्ते विचार करत नसल्याने आज शेती परवडेनाशी झाली आहे.

सर्वसामान्य नोकरीवाल्यांवर संक्रांत

पूर्वी पुण्या-मुंबईची नोकरी चालायची, मुंबईसारख्या शहरातील मुले मुलींना पसंतीत असायची. मात्र, सरकारी व जास्त पॅकेजची नोकरी सोडली तर सर्वसामान्य घरातील सामन्य नोकरीवाल्यांची दशाही शेतकऱ्यांसारखीच झाली आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्‍या. खासगी नोकरीच्या धास्तीने अनेक वेळा बोलणी फिस्कटल्याचे मुंबई उपनगरीय परिसरात राहणाऱ्या एका युवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सध्या मुलाची नोकरी संकटात आलीच तर पर्यायी व्यवस्था काय हे अधिक बघितले जाते. म्हणजे, आर्थिक स्थैर्याला महत्त्व आले आहे. त्यात पॅकेजच्या स्पर्धेमुळे लग्न लागण्यास जमण्यास विलंब होत आहे. त्यामुळेच शेती करणाऱ्या मुलांची कुचंबणा होत आहे.

- आत्माराम ठाकूर, ऋणानुबंध वधू-वर सूचक मंडळ, पनवेल

शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, शेतकरी मुलांना मुली मिळत नाहीत, हे तितकेच खरे आहे. अनेकदा मुली लग्नास तयार असतात. मात्र, शेतीत काम करणारा नाही, असे सांगतात. त्यामुळे शेतकरी मुलांनी कुठे जावे, हा सामाजिक प्रश्न आहे.

- कमलाकर धुळप, वर-पिता

शेती बेभरवशाची झाली आहे. त्यामुळे मुलींना आर्थिक स्थितीविषयी चिंता वाटते. त्यामुळेच शेतकरी मुलापेक्षा आर्थिक स्थैर्य असलेल्या नोकरदार किंवा तशा स्वरूपाच्या मुलांना प्राधान्य दिले जाते.

- सुधाकर घाडगे, वधू-पिता

गावाकडे शेतीही आहे. मुंबईला खासगी नोकरीही आहे; परंतु पॅकेज आणि सरकारी नोकरीच्या अपेक्षेने वधू पक्षाकडून लग्नाला नकार दिला जात आहे.

- रणजित जाधव, विवाह इच्छुक युवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT