बळिराजाला लॉकडाउनची चिंता! दहा वर्षांत 37,755 शेतकरी आत्महत्या Sakal
महाराष्ट्र बातम्या

बळिराजाला लॉकडाउनची चिंता! दहा वर्षांत 37,755 शेतकरी आत्महत्या

बळिराजाला लॉकडाउनची चिंता! दहा वर्षांत 37,755 शेतकरी आत्महत्या

तात्या लांडगे

स्वत:चे पोट उपाशी ठेवून जगाची भूक भागविणारा जगाचा पोशिंदा सततच्या नैसर्गिक संकटांचा सामना करून थकला आहे.

सोलापूर : हमीभावाची प्रतीक्षा, खासगी सावकारकीचा डोक्‍यावरील बोजा, मुला-मुलींच्या शिक्षणाची (Education) व विवाहाची चिंता, एकरकमी एफआरपी (FRP) नाही, अतिवृष्टी (Heavy Rains), अवकाळी, दुष्काळ, महापूर (Floods) अशा संकटांशी सामना करतानाच जगाचा पोशिंदा थकल्याचे चित्र आहे. 2001 ते 2021 या काळात कृषिप्रधान राज्यातील तब्बल 37 हजार 755 शेतकऱ्यांनी (Farmers) गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडील (Department of Relief and Rehabilitation) माहितीवरून स्पष्ट झाले आहे. (Farmers in the state fear a resumption of lockdown due to rising corona)

स्वत:चे पोट उपाशी ठेवून जगाची भूक भागविणारा जगाचा पोशिंदा सततच्या नैसर्गिक संकटांचा (Natural Calamities) सामना करून थकला आहे. अनेकदा सरकार बदलले, परंतु उपाययोजना कागदावरच राहिल्या. साखर कारखानदारी (Sugar Factories), पर्यायी रोजगार मिळाल्याने कोकण (Konkan), पुणे (Pune) विभागातील आत्महत्या कमी झाल्या. परंतु अमरावती (Amravati), औरंगाबाद (Aurangabad) हा विभाग शेतकरी आत्महत्येत दहा वर्षांनंतरही अव्वलच आहे. राज्यातील औरंगाबाद, नांदेड (Nanded), बीड (Beed), उस्मानाबाद (Osmanabad), अमरावती, अकोला (Akola), यवतमाळ (Yavatmal), बुलढाणा (Buldhana), वर्धा (Wardha) व जळगाव (Jalgaon) या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद आहे. कर्जमाफी, वीजबिल माफी, एकरकमी एफआरपी, शेतमालाला हमीभाव मिळेल, या आशेवरील शेतकऱ्यांचा काही बाबतीत अपेक्षाभंग झाला आणि अडचणीत वाढ झाली. तेवढ्यात मार्च 2020 मध्ये राज्यात कोरोनाचा (Covid-19) शिरकाव झाला आणि आता तिसऱ्या लाटेला सुरवात झाली आहे. वाढलेली बेरोजगारी अन्‌ मुलांच्या नोकरीचा प्रश्‍न, नापिकी व शेतमालांचे गडगडलेले दर यास शेतकरी तोंड देत आहे. आता तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाउन (Lockdown) होईल की काय आणि शेतातील उभ्या पिकांचे काय होईल, याची चिंता बळिराजाला सतावू लागली आहे.

दोन वर्षांत 5219 आत्महत्या (विभागनिहाय)

  • कोकण : 00

  • पुणे : 41

  • नाशिक : 691

  • औरंगाबाद : 1,616

  • अमरावती : 2,271

  • नागपूर : 600

'कोकण'मधील आत्महत्या थांबल्या

राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागांमध्ये सर्वाधिक आत्महत्येचा विभाग म्हणून अमरावती, औरंगाबादची ओळख कायम आहे. दिलासादायक बाब म्हणजे, कोकण विभागात दोन वर्षांत एकही शेतकरी आत्महत्या झाली नाही. पुणे विभागातील आत्महत्याही कमी झाल्या आहेत. मागील दहा वर्षांत सर्वाधिक शेतकरी आत्महत्येची नोंद 2015 मध्ये (3263) झाली. त्यानंतर 2016 मध्ये तीन हजार 80 तर 2017 मध्ये दोन हजार 917 आत्महत्यांची नोंद झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बॅंकांकडून आता तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आत्महत्या थांबतील, असा विश्‍वास राज्य सरकारने व्यक्‍त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT