ujani dam sakal
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

उजनीत पहिल्यांदा १९८० मध्ये पाणी साठविले गेले. काही वर्षांचा अपवाद वगळता दरवर्षी पावसाळ्यात १०० टक्के भरलेल्या धरणाने सात महिन्यांत तळ गाठला. त्याचे कारण म्हणजे सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून २० टीएमसी पाणी सोडावे लागायचे. धरण उणे २० टक्के झाल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नसल्याने ऐन उन्हाळ्यात अडचणीवेळी शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते.

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरणाची साठवण क्षमता १२३ टीएमसीपर्यंत असताना देखील आठमाही नियोजनामुळे केवळ ८४.३४ टीएमसीच पाणी वापरण्यास परवानगी आहे. त्यातील ६३.६५ टीएमसीच पाणी सिंचनासाठी आहे. २०२१ मध्ये नव्याने पाणीवापर निश्चित झाले आहे. दरम्यान, भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी वर्षातून चारवेळा विशेषत: उन्हाळ्यात पाणी सोडले जात असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’चाच अनुभव शेतकऱ्यांना आला. पण, आता समांतर जलवाहिनी कार्यान्वित झाल्यावर धरण उणे पातळीत जाणार नाही आणि शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही मुबलक पाणी मिळेल.

उजनीत पहिल्यांदा १९८० मध्ये पाणी साठविले गेले. काही वर्षांचा अपवाद वगळता दरवर्षी पावसाळ्यात १०० टक्के भरलेल्या धरणाने सात महिन्यांत तळ गाठला. त्याचे कारण म्हणजे सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून २० टीएमसी पाणी सोडावे लागायचे. धरण उणे २० टक्के झाल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नसल्याने ऐन उन्हाळ्यात अडचणीवेळी शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. कधीकधी धरण उणे झाल्यावर शेतीला पाणी सोडता येणार नाही म्हणून गरज नसतानाही पाणी सोडावे लागले.

आता समांतर जलवाहिनीमुळे शहराला नदीतून पाणी सोडणे बंद होईल. १८० ‘एमएलडी’ क्षमतेच्या नव्या जलवाहिनीतून वर्षभरात दोन टीएमसी तर जुन्या जलवाहिनीतून एक टीएमसी, असे अवघ्या तीन टीएमसीत शहराची तहान भागणार आहे. त्यामुळे जवळपास १८ टीएमसी पाण्याची बचत होणार असल्याने डिसेंबर ते जून दरम्यान गरजेनुसार शेतीसाठी तीन-चारवेळा पाणी सोडणे शक्य होईल, पण त्याचा निर्णय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीतच होईल.

जलवाहिनीच्या कामाला जानेवारी उजाडणार

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांआड करण्यासाठी सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. सध्या सावळेश्वर व वरवडे टोल नाक्याजवळ आणि टेंभुर्णी बायपासजवळील काम झालेले नाही. याशिवाय दोन ठिकाणच्या खासगी विहिरींमुळे पण तेथे काम थांबले आहे. नोव्हेंबरअखेर मुदत असलेले हे काम निवडणुकीमुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालेल, अशी सद्य:स्थिती आहे. काम पूर्ण झाल्यावर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात बदल होईल, असे बोलले जात आहे.

जानेवारीपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल

समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून जानेवारीपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल. महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली अनेक अडचणींवर मात करत जलवाहिनीचे काम पूर्ण होत आहे. समांतर जलवाहिनी झाल्यावर नदीतून पाणी घ्यावे लागणार नाही. सोलापूर शहरासाठी २४ तास पाइपलाइनमधून पाणी घेतले जाणार आहे. त्यातून शहराची गरज निश्चितपणे भागेल.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, महापालिका, सोलापूर

धरणातील ८४.३४ टीएमसी पाण्याचे वाटप असे...

  • योजना पाणी तरतूद

  • खासगी उपसा सिंचन योजना ७.६३ टीएमसी

  • प्रवाही सिंचन योजना ३२.८९ टीएमसी

  • सीना-माढा उपसा सिंचन योजना ४.७५ टीएमसी

  • भीमा-सीना जोड कालवा ३.१५ टीएमसी

  • दहिगाव उपसा सिंचन योजना १.८१ टीएमसी

  • शिरापूर उपसा सिंचन योजना १.७३ टीएमसी

  • आष्टी उपसा सिंचन योजना १ टीएमसी

  • बार्शी उपसा सिंचन योजना २.५९ टीएमसी

  • एकरुख उपसा सिंचन योजना ३.१६ टीएमसी

  • सांगोला उपसा सिंचन योजना २ टीएमसी

  • मंगळवेढा उपसा सिंचन योजना २.०४० टीएमसी

  • लाकडी निंबोडी सिंचन योजना ०.९० टीएमसी

  • बाष्पीभवन १४.६८ टीएमसी

  • बिगर सिंचन पाणीपुरवठा योजना २.७५ टीएमसी

  • औद्योगिक पाणी वापर ३.२६ टीएमसी

  • एकूण पाणीवाटप ८४.३४ टीएमसी

भीमा नदीचे पाणी रेकॉर्डमध्ये नव्हतेच

महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश या तीन राज्याच्या लवादातील तरतुदीप्रमाणे उजनीतील ८४ टीएमसी पाणीच वापरता येते. वास्तविक पाहता २८ फेब्रुवारीनंतर धरणातून नदी, कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही. पण, पावसाळ्यानंतर फेब्रुवारीपर्यंत निश्चित सगळे पाणी वापरले जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी सोडले जाते. मात्र, भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी सोडलेल्या पाण्यामुळे शेतीसाठी पाणी सोडण्यास अडचणी यायच्या. आता समांतर जलवाहिनीमुळे धरणात मुबलक पाणी शिल्लक राहणार असून तेच पाणी शेतकऱ्यांना अडचणीवेळी सोडणे शक्य होणार आहे. दुसरीकडे शहराला पाणी सोडणे बंद झाले तरीदेखील नदी काठावरील शेतकऱ्यांसाठी भीमेतून किमान एक ते दोन आवर्तने सोडावीच लागतील. त्यासंबंधीचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून होईल, असेही जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT