महाराष्ट्र बातम्या

Accident: सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू तर एक जण जखमी

Solapur Pune National Highway| बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मंजूर असलेल्या साहित्याचे किट आणण्यासाठी निघाले होते

राजकुमार शहा

Solapur: मोटर सायकलला मालट्रकने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एका 25 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला. हा अपघात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरा नजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा जवळील सर्विस रोडवर सकाळी 10 वाजता झाला. मैना कुमार वाघमारे वय 25 रा करकंब असे मृत महिलेचे नाव आहे. तर दत्तात्रय महादेव मांजरे वय 30 रा करकंब असे जखमीचे नाव आहे. जखमी वर मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार मृत मैना वाघमारे व जखमी दत्तात्रय मांजरे हे मोटरसायकल क्रमांक एम एच 13 सीजी 62 35 वरून करकंब वरून सोलापूर येथे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मंजूर असलेल्या साहित्याचे किट आणण्यासाठी निघाले होते.

त्यांची मोटार सायकल मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश व्दारा जवळ येताच पाठीमागून उजव्या बाजूने भरधाव येणाऱ्या मालट्रक क्रमांक के ए 46/2560 ने मोटरसायकलच्या हॅंडलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दत्तात्रेय मांजरे हे रस्त्याच्या बाजूला पडले.

तर मैना वाघमारे या मालट्रकच्या चाकाखाली पडल्याने त्यांच्या डोक्यावरून चाक गेले त्यामुळे त्या जागीच मृत पावल्या. या प्रकरणी मालट्रक चालक मोहन शंकराप्पा सूर्यवंशी वय 41 रा हुमनाबाद याच्या विरोधात दत्तात्रेय मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास अंमलदार अतुल क्षीरसागर करीत आहेत.

दरम्यान मोहोळ ते सोलापूर या महामार्गावरील मोहोळ शहरात नव्याने झालेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता अरुंद असून त्याच्या दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू आहे. या पूर्वीही याच रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी शहरवासीयां मधून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT