Father Of Loksabha  esakal
महाराष्ट्र बातम्या

Father Of Loksabha : पंतप्रधानांचा निरोप डावलून त्यांनाच भेटायला बोलावणारे लोकसभा अध्यक्ष गणेश माळवणकर

स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान गणेश वासुदेव माळवणकर यांना मिळाला

सकाळ डिजिटल टीम

Father Of Loksabha : स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान गणेश वासुदेव माळवणकर यांना मिळाला. माळवणकर याना 'फादर ऑफ लोकसभा' असेही म्हंटले जाते. आज त्यांचा स्मृतीदीन आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू हे अशा स्थानी विराजमान होते. जिथे त्यांचा निरोप डावलण्याची कोणी हिम्मतही करू शकत नाही. पण, गणेश माळवणकर यांनी हे धाडस केले. आणि त्याचा परिणाम काय झाला हे पाहुयात.

गणेश मावळणकर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळचे मावळंगे गावचे. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. त्यानंतर त्यांचे कायमचेच वास्तव्य अहमदाबादमध्ये होते. 1912 मध्ये त्यांनी कायद्याची परीक्षा प्रथम श्रेणीने पास झाले. कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी 1913 मध्ये वकीली पेशात प्रवेश केला आणि काही वेळातच ते एक प्रख्यात वकील म्हणून नावारूपास आले. माळवणकर यांचा विवाह भारतीय स्वातंत्र्यसैनिक सुशीला मावळंकर यांच्याशी झाला होता.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची राजकीय घडी बसेपर्यंत माळवणकर पं. नेहरूंच्या सोबत होते. म्हणजे त्यांना भेटायला कार्यालायत जाणं येणं व्हायचं. पण जेव्हा ते अध्यक्ष झाले तेव्हा लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी वाढली. असे असेल तरी तत्कालिन पंतप्रधानांना ठणकावण्याची धमक त्यांच्यात होती. लोकसभेचे अध्यक्ष बनल्यानंतर गणेश मावळणकर हे सभागृहाच्या कामकाजाबाबत आणि शिस्तीच्या नियमांसाठी कमालीचे आग्रही असायचे.

भारताचे पहिले पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आणि गणेश माळवणकर यांचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. पंतप्रधान कार्यालयातून निरोप येणे ही आजही खूप मोठी गोष्ट मानली जाते. त्यावेळीही भेटायला येण्याचा निरोप पंतप्रधान नेहरू यांनी माळवणकरांना पाठवला. त्यावेळी माळवणकर लोकसभा अध्यक्ष होते. मी तूम्हाला भेटायला येणार नाही असा निरोप धाडला.

मी या संसद भवनाच्या सभापतीपदी बसलो आहे. या खूर्चीचा मान मोठा आहे. मी किंवा इतर कोणताही अध्यक्ष हा सर्वोच्च असल्याने तो कोणाच्याही दारात जाणार नाही, असे उत्तर पत्रातून माळवणकर यांनी नेहरूंना पाठवले. पंतप्रधानांनी त्यांना भेटायला यावे, असे मावळणकरांनी सांगितले.त्यावर लोकसभा अध्यक्षांचा मान ठेवत नेहरुही त्याच्या भेटीसाठी आले होते.

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जरी चुकले तरी मावळणकर त्यांना चूका दाखवायला घाबरत नसत. लोकसभेत सर्व सदस्यांपुढे काही निर्णय मांडण्याच्या बाबतीतही नेहरूंना माळवणकरांनी सुनावले होते. १९५३ मध्ये नेहरू सरकारने असेच परत सहा वटहुकूम काढले. त्यावर सभासदांनीच आक्षेप घेऊन ‘ही सभागृहाची प्रतिष्ठा आणि हक्कांची मुद्दाम केलेली पायमल्ली आहे’ असे बोलून दाखविले.

माळवणकरांवर सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा होता. महात्मा गांधींच्या केलेल्या सत्याग्रह चळवळीतही ते सामील झाले होते. माळवणकर यांनी सुमारे 2 दशके अहमदाबाद नगरपालिकेच्या संघटनांमध्ये स्वतःला वाहून घेतले. 1919 पासून 1937 पर्यंत अहमदाबाद नगरपालिकेचे सदस्य म्हणून काम केले. 1930-33 आणि 1935-36 दरम्यान त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले.

मावळणकर यांची लेखनशैलीही अतिशय प्रभावी होती. 1942-1944 मध्ये कारागृह भेटीदरम्यान भेटलेल्या कैद्यांच्या वास्तविक परिस्थितीवर गुजराती भाषेत लिहिलेले ‘मानवता झरण’ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय झाले. नंतर या पुस्तकाचे इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले. त्यांचे संस्मरण नावाचे आणखी एक पुस्तक आहे जे गांधीजींवरील त्यांच्या लेखांवर आधारित आहे. माय लाइफ या नावाने त्यांनी त्यांच्या वकिलीच्या दिवसांशी संबंधित घटनांचे संकलनही केले आहे. 27 फेब्रुवारी 1956 रोजी अहमदाबाद येथे हृदयविकारामुळे त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT