Crime News esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News: जन्मदाता बाप तरी कशी म्हणू तुम्हा मी? लेकीचा नराधम पित्याला सवाल

वासनांधाकडून कळी कुस्करली; विरोधाच्या मूक भावनांनी भिंती काळवंडल्या, ओरबाडलेल्या शरीरसुखालाही नतद्रष्टांनी सुख मानलं

सकाळ डिजिटल टीम

शिवाजी भोसले - आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या आणि दाही दिशा आयुष्याच्या वाटेवर अंधार पसरलेल्या त्या अभागी लेकीला चार भिंतीआड अंधारात शय्यासोबत करावी लागायची...

नाव ओळखीचा, ना पाळखीचा... ना जातीचा, ना पातीचा ...ना धर्माचा... यापूर्वी कधी तोंडही न पाहिलेलं...ना काळा... की गोरा... हे देखील न बघितलेलं... तरीपण त्याच्याकडे शरीर सोपवायचं... इज्जत अन अब्रूवर घाला घालून घ्यायचा... गिधाड ज्याप्रमाणे मांसाचे लचके तोडतो, त्याप्रमाणे वासनेची आग शमविण्यासाठी आलेले नतदृष्ट अब्रूचे लचके तोडायचे अन्‌ आपल्या मनाचं समाधान करून घ्यायचे. असं हे नेहमीचंच चाललेलं असायचं.(Latest Marathi News)

जन्मदाता पिता, दलाल आण्टी आणि संगीत बारी थिएटरमधील पार्टीची मालकीण मावशी यांना त्याचं काहीच वाटत नसायचं. त्या भयावह दलदलीत असे कित्येकजण आले आणि अक्षरश:अब्रूवर घाला घालून गेले.

‘त्या’ बिचाऱ्या अभागी लेकीच्या मनाला हे अजिबात पटत नव्हतं. जिवंतपणी भोगावा लागणारा हा नरक नको वाटायचा. पण करायचं काय? सांगायचं तरी कुणाला? ज्या बापानं जन्म दिला, दुनिया दाखविली त्याच बापानं हा नरक नशिबी आणला होता. बापाबद्दल प्रचंड चीड यायची. त्यांनं जन्म दिला नसता तरी बरं झालं असतं असं वाटायचं.

पावसानं झोडपलं अन्‌ राजाने मारलं तर तक्रार कोणाकडे करायची ? असं सगळं ते. तरीही रोजच इज्जत अन् अब्रूचे लचके तोडण्याच्या दलदलीतून बाहेर पडायचं तिनं ठरविलं. होत असलेला जुलूम, अन्याय नियतीलाच मान्य नसावा. त्या अभागी लेकीला मार्ग सुचला. आयुष्याचा अंधार बनलेली,चाचपडणारी तिची वाट जणू ‘प्रकाश’मय झाली. त्या दलदलीतून बाहेर पडण्याचं पहिलं पाऊल पडलं.(Latest Marathi News)

करमाळा तालुक्यातील एका छोट्याशा गावात राहणारे नवरा-बायको.या दोघांच्या संसार वेलीवर उमललेल्या कळीच्या नशिबी असं काही भयानक येईल, हे स्वप्नातही कुणाला वाटलं नसावं.‘कळी’ फुलण्याआधीच नवरा-बायको हे कायमचे वेगळे झाले. यादरम्यान लेकीने आपल्या पित्यासोबत राहावं अशी तडजोड त्यांच्यामध्ये झाली. त्या अभागी लेकीला सोडून जन्मदाती पुण्याला निघून गेली. तिथं तिनं एकाशी लग्न करून संसार थाटलेला.(Latest Marathi News)

आई गेल्यानंतर लेक बापाबरोबर राहू लागली.आई-बापाच्या कायमचे वेगळे राहण्याच्या निर्णयातून या लेकीवर मोठा आघात झालेला. तरीपण तो आघात झेलून ती बिचारी दिवस कंठत होती. यादरम्यान बापाच्या मनात मात्र वेगळं शिजत चाललेलं. आईविना पोरके झालेल्या या बापाने लेकीबद्दल वेगळा विचार केला. कसाई वागणार नाही, त्यापलीकडे जाऊन बाप आपल्या लेकीशी वागला.(Latest Marathi News)

अहमदनगरच्या एका आण्टीच्या मध्यस्थीने आपल्या चिमुरड्या बारा वर्षाच्या पोटच्या गोळ्यालाच नराधम बापाने पुण्याला संगीतबारी थिएटरमध्ये एका पार्टीच्या मालकीणीला विकलं. एवढचं नव्हे तरजन्माला घातलेल्या आपल्या लेकीला नराधम बापानं जणू गिऱ्हाईकच बनविलं.

आपल्या पोटच्या लेकीला तीनवेळा विकलं. लेकीला विकून सहा लाखांची कमाई करण्यात बापानं जणू धन्यता मानली. संगीतबारी कला केंद्रामधील कोवळी कळी बघून अनेक नराधम चेकाळायचे. त्या कळीचा नराधम सौदा करायचे. त्या अभागी लेकीला केवळ वासनेची आग शमविण्यासाठी आलेल्या नराधमांकडे मन मारून आपलं शरीर सोपवावं लागायचं. तिथं तिच्या अब्रूचे लचके तोडले जायचे. अवघ्या बारा वर्षाची कळी वासनांध रोजच कुस्करत होते.(Latest Marathi News)

दरम्यान, नालायक बापाला याचे काही देणे घेणे नव्हतं. नाचकाम अन्‌ सेक्सच्या दलदलीमध्ये तिची अत्यंत घुसमट व्हायची, तिच्यावर अन्याय, जुलूम व्हायचा. वासनांध गिधाडं तिच्यावर तुटून पडायची. तिच्या अब्रूचे लचके तोडायचे. सगळं काही मर्यादेपलीकडचं होतं. त्या लेकीला हे सगळं असह्य झालं होतं.

सोलापूरजवळच्या एका कला केंद्रात तिला विकलं असताना तिने फेसबुक वरून आपल्या जन्मदात्या आईशी संपर्क केला. धाय मोकलून रडत स्वतःवर कोसळलेल्या परिस्थितीचा लेकींनं जणू आईपुढं पाढाच वाचला. त्या माऊलीला मायेचा पाझर फुटला. तिच्यातलं ‘आईपण’ खऱ्या अर्थानं जागं झालं.

आपल्या पश्‍चात नराधम बापानं लेकीची अशी गत करावी, हे तिला मान्य झालं नाही. ‘त्या’ दलदलीमधून लेकीची सुटका करण्यासाठी ती पुण्यातून बाहेर पडली. सोलापूरजवळच्या ज्या संगीतबारी कला केंद्रात लेकीला विकलं होतं, तिथं ती आली. लेकीला मुक्त करण्याची विनवणी आईनं पार्टी मालकिणीकडं केली.(Latest Marathi News)

मात्र, बापानं पैसे उचलले आहेत, पैसे फिटेपर्यंत तुमच्या लेकीला सोडणार नाही, असं पार्टी मालकीणीने सांगितल्यानंतर या आईने लेकीच्या प्रकरणात सगळ्याच दोषींना धडा शिकवायचं ठरवलं आणि सोलापुरातील जोडभावी पेठ पोलिस ठाणे गाठलं. तिथं नराधम बाप दलाल तसचं आण्टीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. लेकीच्या बाबतीत बाप जो काही वागला, मधल्यामध्येच बक्कळ पैसा मिळतोय म्हणून दलाल आण्टी ज्याप्रमाणं वागली, त्याची शिक्षा त्यांना मिळत आहे. हे दोघेही गजाआड झाले.

आयुष्याच्या वळणावर या लेकीवर खूप आघात झाले. पण आईच्या मदतीनं ती ‘त्या’ दलदलीमधून कायमची सुटली. उर्वरित आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी जणू तिच्या आयुष्यातील अंधकार दूर झाला. तिच्या आयुष्याच्या वाटा पुन्हा उजळल्या. तिच्यासाठी आकाश मोकळं झालं.

अन्‌ ‘ती’ हंबरडा फोडत बिलगली आईला

सोलापूर नजीकच्या कला केंद्रात या लेकीला जेव्हा जन्मदाती आई न्यायला आली, तेव्हा ती लेक आईच्या गळ्यात पडली. हमसून हमसून रडली. आईला बिलगली‌. आईनंदेखील तिला उराशी कवटाळलं. जन्मदाती आई आणि लेक यांची कित्येक वर्षानंतर या वळणावर भेट झाली. 

नराधम बाप खोटारडाच

तब्बल सात वेळा लेकीला विकणाऱ्या बापाला पोलिसांनी विचारलं तेव्हा कोरोना काळात झालेलं कर्ज फेडण्यासाठी लेकीला विकलं असं सांगितलं. पण त्याचं हे सांगणं थोतांड अन्‌ खोटारडं आहे. कोरोनापूर्वीच त्यानं लेकीला विकलं होतं.नराधम बाप खोटारडाच निघाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT